टेस्टि झणझणीत अंड्याचा खिमा | एग खीमा मसाला एकदम निराळा रेसिपी
Tasty Zanzanit Andyacha Kheema | Egg Kheema Masala Different Style Recipe In Marathi
आपण ह्या अगोदर अंडी वापरुन बऱ्याच रेसीपी पाहिल्या, आज आपण अंडी वापरुन अजून एक मस्त रेसिपी बनवणार आहोत. आपण चिकन खीमा किंवा मटन खीमा बनवतो तो मस्त टेस्टि लागतो. पण अंड्याचा खीमा बनवला आहे का? बनवून पहा सगळे आवडीने खातील.
The Tasty Zanzanit Andyacha Kheema | Egg Kheema Masala Different Style in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Zanzanit Andyacha Kheema | Egg Kheema Masala
अंड्याचा खीमा बनवायला अगदी सोपा आहे. त्याची टेस्ट पण अगदी निराळी लागते. अचानक कधी पाहुणे आलेतर ही डिश बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही कधीच खाल्ला नसेल असा अंडा खीमा मसाला बनवून पहा.
अंड्याचा खीमा बनवताना अंडी उकडून घेऊन मस्त पैकी चॉप करायची आणि मग बनवायची. झटपट टेस्टि डिश बनते.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 अंडी
2 मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 तमालपत्र
1 दालचीनी तुकडा
1 हिरवी मिरची (चिरून)
1/4 कप कोथिंबीर
1/4 कप पुदिना पाने
1/4 टी सपू हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून सजावटी करिता
कृती: प्रथम अंडी उकडून सोलून बाजूला ठेवा. कांदे बारीक चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुतून घ्या, कोथिंबीर व पुदिना धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. अंडी थंड झाल्यावर अंड्यातील पांढरा भाग चिरून घ्या, व पिवळा भाग हातांनी कुस्करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून तमाल पत्र व दालचीनी टाकून मग चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या, कांदा चांगला परतून झालाकी त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून 1 मिनिट परतून घ्या, मग टोमॅटो घालून परतून घ्या. आता लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये कोथिंबीर व पुदिना पेस्ट व 2 टे स्पून पाणी घालून मसाला थोडा परतून घ्या, मग त्यामध्ये 1/4 कप पाणी घालून उकळी आलीकी त्यामध्ये कुस्करून ठेवलेला पिवळा योक घालून मिक्स करून घ्या, मग अंड्याचा पांढरा भाग घालून मिक्स करून थोडेशी कोथिंबीर घालून मिक्स करून 2-3 मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
आता गरम गरम अंड्याचा खीमा पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.