झटपट व्हेज चीज ब्रेड रोल मुलांचा आवडतीचा नाश्तासाठी डब्यासाठी
Zatpat Easy Veg. Cheese Spring Bread Roll For Kids Nashta For Tiffin In Marathi
आपण रोज विचारात पडतो मुलांना डब्यात किंवा नाश्तासाठी काय द्यायचे ते सुद्धा अगदी पौष्टिक. मुले भाज्या खायचा कंटाळा करतात तसेच त्यांना रोज नवीन काही पाहिजे असते व जर त्यांच्या आवडतीचे चटपटीत पदार्थ बनवले तर मुले त्यांचा डब्बा किंवा नाश्ता मिनिटांत संपवतील.
The Zatpat Easy Veg. Cheese Bread Roll For Kids Nashta For Tiffin in Marathi be seen on our You tube Chanel Zatpat Easy Veg. Cheese Bread Roll For Kids Nashta For Tiffin
आज आपण अशीच एक मस्त मुलांना आवडणारी डिश बनवणार आहोत. मुलांच्या बरोबर घरातील बाकी मेंबर सुद्धा आवडीने खातील. आपण ब्रेकफास्ट ला किंवा मुलांच्या छोट्या पार्टीला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो.
व्हेज चीज ब्रेड रोल बनवताना बटाटे व आपल्याला पाहिजे त्या मुलांच्या आवडतीच्या भाज्या त्यामध्ये वापरू शकतो. तसेच चीज ही मुलांचे आवडतीचे आहे त्यामुळे मुले अगदी आवडीने खातील.
साहित्य:
8 ब्रेड स्लाइस
सारणासाठी:
3 मध्यम आकाराचे बटाटे
2 टे स्पून कांदा
2 टे कोथिंबीर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/2 टी स्पून चाट मसाला
1 /4 वाटी चीज (किसून)
(मटार, गाजर,शिमला मिरची)
मीठ चवीने
आवरणासाठी:
1/2 कप मैदा
थोडेसे मीठ
1/2 कप पाणी
1 कप ब्रेड क्रमब
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. कांदा कोथिंबीर चिरून घ्या, चीज किसून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. एका बाउल मध्ये मैदा व पाणी मिक्स करून चिमुटभर मीठ घालून एक पेस्ट बनवा. दुसऱ्या एका बाउलमध्ये ब्रेड क्रमब घ्या. ब्रेडच्या कडा कापून बाजूला ठेवा ह्या कडा आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून ब्रेड क्रमब बनवू शकतो.
एका बाउल मध्ये बटाटे, चिरलेला कांदा, कोथिंबीर, धने-जिरे पावडर, हिरवी मिरची, चिलीफ्लेस्क, चाट मसाला, चीज, मीठ चवीने व आपल्याला पहिजे त्या भाज्या बारीक चिरून घाला, आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. व त्याचे एक सारखे 8 लांबट गोळे बनवा.
एक ब्रेड स्लाइस घेऊन लाटण्यानि थोडी पातळ लाटून घ्या. मग ब्रेडच्या कडेला मैदाची पेस्ट लाऊन घ्या. मधोमध बटाट्याची एक वळकुटि ठेवा व बेड फोल्ड करून बाजूनी चिटकवा, मैदाची पेस्ट लावल्याने ब्रेड लगेच चिटकेल, मग अश्या प्रकारे सर्व ब्रेड रोल बनवून घ्या.
आता तेल गरम करायला ठेवा, मग एक ब्रेड रोल घेऊन मैदयाच्या घोळा मध्ये घोळून मग ब्रेड क्रमब मध्ये घोळून मध्यम विस्तवावर छान गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व ब्रेड रोल तळून घ्या.
गरम गरम ब्रेड रोल टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.