1 Cup Wheat Flour Tasty Healthy Nashta For Kids Recipe In Marathi
1 कप गव्हाच्या पिठापासून सुंदर नाश्ता सगळे विचारतील कसा बनवला समोसा कचोरी विसराल
आता मुलांच्या शाळेला सुट्या लागल्या आहेत. मग रोज काहीना काही नवीन खायला पाहिजे, पण आईला वाटते मुलांनी पौष्टिक खावे. गव्हाचे पीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
आज आपण गव्हाच्या पिठापासून एक छान नाश्ता बनवणार आहोत, बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच छान टेस्टि सुद्धा लागतो. मुले तर अगदी आवडीने खातील, अश्या प्रकारचा नाश्ता बनवायल तर समोसा कचोरी विसरून जाल.
The 1 Cup Wheat Flour Tasty Healthy Nashta For Kids Recipe In Marathi be seen on our You tube Chanel 1 Cup Wheat Flour Tasty Healthy Nashta For Kids
आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर किंवा इतर वेळी म्हणजे नाश्तासाठी किंवा जेवताना साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
आवरणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
सारणासाठी:
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून, किसून)
1 टी स्पून चिली फ्लेस्क
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून चाट मसाला
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
मीठ चवीने
2 टे स्पून टोमॅटो केचप
2 टे स्पून हिरवी चटणी
1 चीज क्युब (तुकडे करून)
घोळ बनवण्यासाठी:
4 टे स्पून मैदा
मीठ चवीने
1 टी स्पून तीळ
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टे स्पून कोथिंबीर
तेल तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून सोलून कुस्करून किंवा किसून घेवून बाजूला ठेवा. गव्हाचे पीठ व मीठ मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
एक बाउल घेऊन त्यामध्ये बटाटे घेऊन चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, चिली फ्लेस्क, चाट मसाला, हिरव्या मिरच्या चिरलेला व मीठ चवीने घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
दुसऱ्या एका बाउल मध्ये मैदा, मीठ चवीने, चिली फ्लेस्क कोथिंबीर व पाणी घालून पातळ घोळ बनवून घ्या, खूप पातळ करायचा नाही आपण भज्या साठी करतो तसा.
आता मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन चपाती सारखा पातळ लाटून घ्या. पोळीच्या कडा कापून चौकोन कापून घ्या, मग त्यावर बटाट्याचे सारण पसरवून घ्या, मग त्यावर टोमॅटो केचप किंवा शेजवान सॉस व हिरवी चटणी लावून घ्या, आता पोळीचे 3” x 3” चे तुकडे कट करून घ्या.
आता एक 3” x 3” चा एक पीस घेऊन त्यामध्ये एक चीज चा तुकडा ठेवून पीस फोल्ड करून घेऊन बाजूनी थोडा दाबून घ्या, जर आपल्याला चीज नाही घालायचे तर तसेच फोल्ड करून घ्या, अश्या प्रकारे सर्व तुकडे फोल्ड करून बाजूला ठेवा.
कढई मध्ये किंवा पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झालेकी एक पीस घेऊन मग मैदयाच्या घोळमध्ये बुडवून तेलात हळुवारपणे सोडा, पॅन मध्ये जेव्हडे तुकडे बसतील तेव्हडे सोडा मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी छान गुलाबी रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व तुकडे तळून घ्या.
आता गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.