17 एप्रिल 2024 बुधवार श्री रामनवमी दुर्लभ संयोग, पूजा विधी व महत्व
17 April Ram Navami 2024 Durlabh Sanyog, Puja Vidhi Mahatva In Marathi
17 एप्रिल 2024 ह्या दिवशी चंद्रमा कर्क राशी मध्ये राहणार आहे, भगवान विष्णु ह्यांच्या सातवा अवतार प्रभू राम ह्यांचा जन्म कर्क लग्न मध्ये झाला होता.
17 एप्रिल बुधवार ह्या दिवशी संपूर्ण देशात राम नवमी साजरी केली जाणार आहे. वाल्मिकी रामायण अनुसार चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथी, अभिजीत मुहूर्त व कर्क लग्न मध्ये श्री राम ह्यांचा जन्म झाला होता. राम नवमी हा दिवशी चैत्र नवरात्री चा शेवटचा दिवस आहे. ह्या दिवशी देशभरात धूम धडाक्यात राम नवमी हा सण साजरा करतात. राम नवमी ह्या दिवशी देवळे छान सजवली जातात.
The 17 April Ram Navami 2024 Durlabh Sanyog, Puja Vidhi Mahatva In Marathi be seen on our You tube Chanel 17 April Ram Navami 2024 Durlabh Sanyog, Puja Vidhi Mahatva
17 एप्रिल 2024 ह्या दिवशी आयोध्या येथे राम मंदिर मध्ये राम नवमी हा सण खूप विशेष पणे साजरा केला जाणार आहे. ह्या वर्षी राम नवमी हा सण खूप शुभ योग मध्ये साजरा केला जाणार आहे. ह्या वर्षी राम नवमी ह्या दिवशी कोण कोणते शुभ योग येत आहेत.
राम नवमी 2024 शुभ योग:
चैत्र नवरात्री च्या शेवटच्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष नवमी तिथी ह्या दिवशी राम नवमी हा सण खूप मोठ्या उत्साहात व भक्ति भावाने साजरा केला जाणार आहे. ह्या वर्षी चैत्र नवरात्री च्या दिवशी खूप चांगला शुभ योग आहे. हिंदू पंचांग नुसार राम नवमी ह्या दिवशी आश्लेषा नक्षत्र, रवि योग व सर्वार्थ सिद्धि योग येत आहे. राम नवमी ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 5 वाजून 16 मिनिट पासून 6 वाजून 8 मिनिट पर्यन्त आहे. तसेच संपूर्ण दिवशी रवी योगचा संयोग आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र मध्ये रवी योग व सर्वार्थ सिद्धी योग खूप शुभ योग आहे. ह्या योगामध्ये पूजा व शुभ कार्य करणे फलदायी आहेत. रवी योग मध्ये सूर्यचा प्रभाव आहे त्यामुळे व्यतीला बऱ्याच कष्टा पासून मुक्ती मिळेल.
शुभ मुहूर्तवर करा भगवान राम ह्यांची पूजा:
नवमी तिथि प्रारम्भ- 16 एप्रिल 2024 दुपारी 1 वाजून 23 मिनिट पर्यन्त
नवमी तिथि समाप्त- 17 एप्रिल 2024 दुपारी 03 वाजून 4 मिनट पर्यन्त
अभिजीत मुहूर्त – अभिजीत मुहूर्त नाही
विजय मुहूर्त- दुपारी 02 वाजून 34 मिनट पासून 03 वाजून 24 मिनट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 06 वाजून 47 मिनट पासून 07 वाजून 09 मिनट पर्यन्त
गजकेसरी योग: 17 एप्रिल ह्या दिवशी गजकेसरी योगचा प्रभाव आहे. भगवान राम ह्यांच्या जन्माच्या वेळी सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग चा शुभ संयोग आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये गजकेसरी योग खूप शुभ मानला जातो. ह्या योगाच्या प्रभावाने व्यक्तिच्या जीवनात मान-सन्मान व यश प्राप्त होते.
राम नवमी 2024 पूजा विधि:
* राम नवमी ह्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्त वर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजेचा संकल्प करा.
* पूजेच्या जागी सीता-राम ह्या नावाचा जाप करीत पूजा साहित्य एकत्र करा.
* मग शुभ मुहूर्तवर भगवान राम ह्यांची प्रतिमा स्थापित करून दूध केसर मिक्स करून त्याने अभिषेक करा.
* भगवान राम व सीता माता ला फूल, हार, चंदन, व अक्षता अर्पित करा.
* मग भगवान राम ह्यांच्या फोटो किंवा मूर्ती समोर तुपाचा दिवा व धूप लाऊन रामचरितमानस चा पाठ करा.
* मग शेवटी विधी पूर्वक आरती म्हणून प्रसाद वाटा.