पाहुणे आले बनवा 5 मिनिटात 2 कच्चे बटाटे वापरून मजेदार नाश्ता नक्की सगळ्यांना आवडेल
5 Minitat 2 Kachche Batate Waprun Zatpat Nashta Recipe In Marathi
अचानक पाहुणे आले तर काय करावे हा प्रश्न पडतो. आपण नेहमी झटपट पोहे, उपीट किंवा भजी बनवतो. पण काहीतरी वेगळे आपण बनवू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला 2 कच्चे बटाटे पाहिजे व गव्हाचे पीठ बाकीचे मसाले आपल्या घरात असतातच.
The 5 Minitat 2 Kachche Batate Waprun Zatpat Nashta Recipe In Marathi be seen on our You tube Chanel 5 Minitat 2 Kachche Batate Waprun Zatpat Nashta
5 मिनिटात आपण हा पदार्थ बनवू शकतो. त्याच्या सोबत आपण घरातील टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस देवू शकतो.
आपल्याला फक्त बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसनिणी किसून घ्यायचे आहेत. मग बाकीची अगदी सोपी पद्धत आहे.
साहित्य:
2 मोठ्या आकाराचे बटाटे
1/2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून ओवा
1 टी स्पून मिरी पावडर
1 1/2 टी स्पून चिली फ्लेस्क
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
मीठ चवीने
तेल फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे सोलून मोठ्या भिकाच्या किसनिणी किसून घ्या, मग 2 वेळा स्वच्छ पाण्यांनि धुवून घ्या, मग पिळून पाणी काढून किसलेले बटाटे एका बाउलमध्ये काढून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या, आल-लसूण कुटून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेले बटाटे, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मिरे पावडर, ओवा, चिली फ्लेस्क, कोथिंबीर, मीठ घालून मिक्स करून घ्या वरतून थोडेसे तेल लाऊन ठेवा. मग त्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवा.
कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झालेकी त्यामध्ये बनवलेले चपटे गोळे छान कुरकुरीत होई पर्यन्त तळून घ्या.
गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.