Different Style Dhaba Style Chicken Gravy Recipe In Marathi
अगदी निराळी चिकन ग्रेव्ही सगळ्यांना आवडेल महागडे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणे सोडाल
आपण चिकनच्या विविध प्रकारच्या ग्रेव्ही कशा बनवायच्या ते ह्या अगोदर पाहिले. आज आपण अजून एक निराळी चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहू या.
आज आपण चिकन ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये हिरवा मसाला व मिरे पावडर वापरणार आहोत. त्यामुळे त्याची टेस्ट अगदी निराळी येते व दिसायला सुद्धा आकर्षक दिसते. अगदी नवीन पद्धतीने बनवले आहे बनवून पहा नक्की आवडेल.
The Different Style Dhaba Style Chicken GravyI n Marathi be seen on our You tube Chanel Different Style Dhaba Style Chicken Gravy
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
मेरिनेट चिकन करिता:
250 ग्राम चिकन
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
ग्रेव्ही करिता:
मसाला वाटण करिता:
2 कप कोथिंबीर
4-5 हिरव्या मिरच्या
1/2 कप दही
2 टे स्पून तेल
खडा मसाला (जिरे,लवंग,तमालपत्र,दालचीनी)
2 मोठे कांदे (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून)
1 टी स्पून मिरे पावडर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती: प्रथम चिकन धुवून, त्याला आल-लसूण, हळद व मीठ लाऊन मिक्स करून झाकून बाजूला ठेवा.
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या, आल-लसूण पेस्ट बनवून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला टाकून चिरलेला कांदा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो व मिरे पावडर घालून परतून घ्या, आता त्यामध्ये चिकन घालून मिक्स करून मंद विस्तवावर 5 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर क मीठ घालून मिक्स करून 5 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये 1 कप पाणी किंवा जरूरत नुसार पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवा व 10 मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजू द्या.
आता झाकण काढून गरम मसाला घालून मिक्स करून 2-3 मिनिट चिकन शिजू द्या. आता गरम गरम चिकन चपाती बरोबर किंवा भाता बरोबर सर्व्ह करा.