Easy Quick Tasty Bachelors Chicken Curry For Beginners Recipe in Marathi
सोपे झटपट स्वादिष्ट बैचलर्स चिकन ग्रेव्ही नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी
आज आपण चिकन ची अगदी सोपी ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहू या, अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे जे नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे.
चिकन ही डिश अशी आहे की ती सर्वाना आवडतो. त्याच्या बरोबर फक्त चपाती व भात बनवला की झाले. ह्या चिकन च्या डिशमध्ये फार काही मसाला वाटायची कटकट नाही अगदी झटपट व मस्त चिकन ग्रेव्ही बनवता येते. आपण चिकन बनवताना वेगवेगळे मसाले बनवत असतो. आपण घरच्या सामाना मध्येच चिकनची ही डिश बनवणार आहोत.
The Easy Quick Tasty Bachelors Chicken Curry For Beginners Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Easy Quick Tasty Bachelors Chicken Curry For Beginners
बनवण्यासाठो वेल 30 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम चिकन बोनलेस किंवा विथ बोन
2 मोठे कांदे उभे पातळ चिरून
2 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 मोठे टोमॅटो बारीक चिरून
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 /2 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 1/2 टी स्पून चिकन मसाला
2 टे स्पून तेल
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून
कृती: प्रथम चिकनच पिसेस धुवून बाजूला ठेवा, कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा 3-4 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्या, आता चिरलेला टोमॅटो घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर व मीठ घालून 1 मिनिट परतून घ्या, आता त्यामध्ये चिकनचे पिसेस घालून मिक्स करून 3-4 मिनिट परतून घ्या, चिकनचे पाणी सुटेल त्यामध्येच परतून घ्या, मग त्यामध्ये गरम मसाला व चिकन मसाला घालून 1 कप पाणी घाला किंवा लागेल तसे पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून 12-15 मिनिट चिकन शिजू द्या.
चिकन शिजले की त्यावर कोथिंबीर घालून चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करा.