Egg + Cauliflower + Batata Chi Ashi Recipe Aapn Hya agodar Nakki Pahili Nasel Recipe In Marathi
अंडी + फ्लॉवर + बटाटा ची रेसिपी आपण ह्या अगोदर कधीच पाहिली नसेल बनवून पहा नक्की आवडेल
अंडी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. आपण फ्लॉवर व बटाटाची भाजी नेहमी बनवतो. आता तीच तीच पद्धतीने भाजी खावून कंटाळा आला असेलतर ह्या पद्धतीने फ्लॉवर व बटाटा भाजी अंडी वापरुन बनवा. अगदी निराळी पद्धत आहे. ह्या अगोदर कधी बनवली नसेल. एकदा बनवून पहा सर्वाना आवडतील.
The Egg + Cauliflower + Batata Chi Ashi Recipe Aapn Hya agodar Nakki Pahili Nasel In Marathi be seen on our You tube Chanel Egg + Cauliflower + Batata Chi Ashi Recipe
आपल्या घरी पाहुणे आले तर आपण काहीतरी नवीन भाजी बनवतो तर अशी भाजी बनवा नक्की पाहुणे तारीफ करतील व रेसिपी सुद्धा विचारतील. जे लोक नॉनव्हेज अगदी आवडीने खातात त्याच्या साठी ही रेसिपी आवडतीची होईल.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 3 जणसाठी
साहित्य:
1 कप फ्लॉवरचे तुरे
1 मोठा बटाटा
3 अंडी
1 मोठा कांदा
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
1/4 वाटी तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
कृती: फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात भिजत ठेवा, बटाटा सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या, अंडी उकडून सोलून घ्या, कांदे चिरून घ्या, टोमॅटो चिरून घ्या, आल-लसूण पेस्ट करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये फ्लॉवरचे तुरे 2-3 मिनिट तळून घेऊन बाजूला ठेवा, मग त्याच कढईमध्ये बटाटे तळून घ्या व बाजूला ठेवा, मग त्याच कढई मध्ये अंडी 2-3 मिनिट मंद विस्तवावर तळून घ्या व बाजूला ठेवा.
त्याच कढई मध्ये अजूनथोडे तेल घालून जिरे व हिंग घालून चिरलेला कांदा घालून छान गुलाबी रंगावर प घ्या मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्या, बारीक चिरलेला टोमॅटो घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, मीठ घालून 1 कप पाणी घाला, पाण्याला उकळी आली को त्यामध्ये तळलेले बटाटे व फ्लॉवर घाला, कढई वर झाकण ठेवून 5-7 मिनिट भाजी शिजू घ्या, मग झाकण काढून गरम मसाला व उकडलेली अंडी घालून परत कढई वर झाकण ठेवा व 2 मिनिट गरम होऊ घ्या, मग कोथिंबीर घालून विस्तव बंद करा.
गरम गरम फ्लॉवर-बटाटा-अंडी भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.