In 15 Minutes Dessert Only 2 Cups Milk Recipe In Marathi
पाडवा स्पेशल 15 मिनिटांत 2 कप दुधापासून डेझर्ट थंडगार असे कधी बनवले नसेल नक्की बनवा आवडेल
उन्हाळा आला की आपल्याला रोज काही ना काही गोड थंड खावेसे वाटते. आपण ह्या अगोदर अश्या बऱ्याच रेसीपी पाहिल्या आहेत.
आज आपण 2 कप दुधा पासून एक सुंदर डेझर्ट बनवणार आहोत. हे डेझर्ट बनायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. अश्या प्रकारचे डेजर्ट बनवण्यासाठी आपल्या घरात जे साहित्य असते त्यापासून बनवता येते.
The In 15 Minutes Dessert Only 2 Cups Milk Recipe In Marathi be seen on our You tube Chanel In 15 Minutes Dessert Only 2 Cups Milk Recipe
आता उन्हाळा आला की मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागतात मग त्यांना रोज काही तरी वेगळे पदार्थ लागतात ते सुद्धा थंडगार असे.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप दूध (फूल क्रीम)
8 टोस्ट
2 टे स्पून कस्टर्ड पावडर
2 टे स्पून मिल्क पाऊडर
3 टे स्पून साखर
1/4 टी स्पून व्हनीला एसेन्स
ड्रायफ्रूट सजावटी करिता
साखर पाक करिता:
1/2 वाटी साखर
1/2 वाटी पाणी
कृती: साखरेचा पाक बनवण्यासाठी एका भांड्यात साखर व पाणी मिक्स करून एकतारी पाक तयार करून त्यामध्ये केशर घालून बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट कट करून बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये दूध, मिल्क पावडर व कस्टर्ड पावडर मिक्स करून मंद विस्तवावर ठेवा. साधारण पणे 8-10 मिनिटांत घट्ट व्हायला लागेल मग त्यामध्ये साखर व व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून मिश्रण परत घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मग वस्तव बंद करून पॅन खाली उतरवून घ्या.
एका चौकोनी ट्रे मध्ये 4 टोस्ट पसरवून ठेवा त्यावर निम्मा साखरेचा पाक एकसारखा ओतून घ्या. मग त्यावर निम्मे कस्टर्डचे मिश्रण ओता मग त्यावर चार टोस्ट पसरवून ठेवा मग त्यावर साखरेचा पाक ओता व परत त्यावर कस्टर्डचे मिश्रण ओता मग त्यावर ड्रायफ्रूटने सजवा.
आता आपले डेजर्ट तयार झाले मग फ्रीज मध्ये 1 तास थंड करून सर्व्ह करा, नक्की सगळे आवडीने खातील.