टेस्टि स्वादिष्ट भेंडी मसाला फ्राय मुलांच्या डब्यासाठी एकदम निराळी पद्धत
Tasty Bhindi Masala Fry For Kids Tiffin Recipe In Marathi
भेंडीची भाजी म्हंटले की मुलांची आवडतीची. भेंडी ची भाजी आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. ह्या अगोदर आपण भरलेली भेंडी, मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहिले.
The Tasty Bhindi Masala Fry For Kids Tiffin Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Bhindi Masala Fry For Kids Tiffin
आज आपण मुलांच्या डब्यासाठी मसाला भेंडी फ्राय कशी बनवायची ते पाहू या. मसाला भेंडी फ्राय बनवायला अगदी सोपी झटपट होणारी व स्वादिष्ट लागते मुले अगदी आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 3 जणांसाठी
साहित्य:
200 ग्राम भेंडी
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 छोटासा टोमॅटो (चिरून)
304 लसूण पाकळ्या (चिरून)
1 /2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून ओवा
कृती: प्रथम भेंडी धुवून, पुसून कोरडी करून घ्या, मग त्याची दोन्ही बाजूनी टोके कापून भेंडी चिरून घ्या. कांदा चिरून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या, लसूण सोलून चिरून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून कांदा व हिरव्या मिरच्या 2 मिनिट परतून त्यामध्ये चिरलेली भेंडी घालून मिक्स करून 7-8 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, झाकण ठेवू नका. मधून मधून हलवत रहा.
भेंडी परतून झाली की त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ व चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून 2-3 मिनिट परत परतून घ्या. मग कोथिंबीर घालून गरम गरम भेंडी मसाला फ्राय सर्व्ह करा.