Tasty Boiled Egg Anda Bhurji | Egg Bhurji Unique Style Recipe In Marathi
टेस्टि एकदम निराळी उकडलेल्या अंड्याची रेसिपी बनवून पहा नक्की आवडेल सर्वजण तारीफ करतील
अंडा भुर्जी आपण नेहमी बनवतो. कधी घरात भाजी नसली किंवा वेळ नाही तर पटकन बनवता येते. आपण अंडा भुर्जी बनवताना नेहमी आपण अंडी फोडून मग बनवतो. आपण आज आपण अंडी न फोडता अंडी उकडून घेऊन त्यापासून टेस्टि लाजवाब उकडलेल्या अंड्याची भुर्जी बनवणार आहोत.
The Tasty Boiled Egg Anda Bhurji | Egg Bhurji Unique Style Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Boiled Egg Anda Bhurji | Egg Bhurji Unique Style Recipe
आपण अश्या प्रकारची अंड्याची भुर्जी बनवून पहा मस्त लागते तसेच छान मऊ सुद्धा लागते. घरातील लहान मुले किंवा मोठी माणसे सुद्धा आवडीने खातील. अगदी निराळी पद्धत आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 अंडी (उकडलेली)
2 मोठे कांदे (चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण
3-4 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
कोथिंबीर (चिरून)
3 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
कृती: प्रथम अंडी उकडून सोलून बाजूला ठेवा, कांदा व टोमॅटो चिरून घ्या, आल-लसूण पेस्ट करून घ्या, हिरव्या मिरच्या चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. अंडी थंड झाली की मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या.
एका पॅन मध्ये तेल गरम करून जिरे घालून मग चिरलेला कांदा घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून 2 मिनिट परतून घ्या, मग टोमॅटो घालून 1 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर व मीठ घालून एक मिनिट परतून मग त्यामध्ये किसलेली अंडी घालून मिक्स करून घ्या मग कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
मग गरम गरम अंडा भुर्जी चपाती बरोबर सर्व्ह करा.