एकदा 3 इन 1 पकोडा करून पहा कांदा-बटाटा-मिरची पकोडा विसरून जाल नवीन रेसिपी
Tasty Crispy 3 In 1 Pakoda Different Style Recipe In Marathi
आपण दुपारी नाश्तासाठी किंवा जेवणात साइड डिश म्हणून भजी बनवतो किंवा सणवाराला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर. भजी हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्या माणसान पर्यन्त सर्वाना आवडतो.
आपण कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरचीची भजी वेगवेगळ्या प्रकाराची बनवतो. पण आज आपण कांदा-बटाटा-मिरची ह्याची एकत्र करून भजी बनवणार आहोत. अगदी निराळी रेसिपी आहे.
3 इन 1 भजी बनवताना कांदा-बटाटा-मिरची उभी चिरून घ्यायची आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 मध्यम आकाराचे कांदे
2 मध्यम आकाराचे बटाटे
8-10 मिरच्या
1” आले
6-7 लसूण पाकळ्या
2 टे स्पून कोथिंबीर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून ओवा
मीठ चवीने
1/2 कप बेसन
2 टे स्पून बेसन
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1 टे स्पून तेल (कडकडीत मोहन)
तेल तळण्यासाठी
कृती: कांदा उभा पातळ चिरून घ्या, कोथिंबीर, हिरवी मिरची आले बारीक चिरून घ्या, बटाटा सोलून त्याचे उभे तातळ काप करून घ्या, जशे आपण फ्रेंच फ्राइजला करतो तसे मग ते पाण्यात घालून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत. शिमला मिरची धुवून त्याचे उभे पातळ काप करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये उभे चिरलेले कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले घालून, त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, ओवा व मीठ घालून बेसन व तांदळाचे पीठ घालून चिली फ्लेस्क मिक्स करून घ्या, त्यामध्ये तेलाचे कडकडीत मोहन घालून मिक्स करून हळू हळू लागेल तसे पाणी वापरुन भज्या सारखे पीठ भिजवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. बटाट्याचा एक काप घेऊन बेसनच्या मिश्रणात मध्ये बुडवून घ्या. बटाट्याला चांगले कोटिग झाले पाहिजे. मग गरम झालेल्या तेलात सोडा अश्या प्रकारे 4-5 बटाटे मिश्रणतात बुडवून तेलात सोडा. मग मध्यम विस्तवावर 3 इन 1 पकोडे तळून घ्या.
अश्या प्रकारे सर्व पकोडे तळून घेऊन टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.