Tasty Crispy Poha Masala Dosa For Kids Recipe In Marathi
साऊथ इडियन स्टाईल इन्स्टंट पोहा मसाला डोसा मुलांना भूक लागली फटाफट बनवा डोसा
इडली डोसा म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. तसेच ह्या साऊथ इंडियन डिश पॉप्युलर सुद्धा आहेत. डोसा बनवायचा म्हंटले की त्यासाठी बरीच प्रोसेस सुद्धा आहे. मग आपल्याला कंटाळा येतो करणकी त्यासाठी वेळ सुद्धा जातो.
आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मसाला डोसा अगदी मिनिटात कसा बनवायचा ते पाहू या. त्यासाठी आपल्याला फक्त पोहे व रवा पाहिजे व मसाला साठी सांबर पावडर पाहिजे. व आंबटपणा येण्यासाठी दही पाहिजे. आहे की नाही एकदम सुटसुटीत पद्धत.
The Tasty Crispy Poha Masala Dosa For Kids Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Crispy Poha Masala Dosa For Kids
आता मुलांच्या शाळेला सुट्ट्या चालू झाल्या आहोत मग त्यांना रोज काहीना काही निराळे खायला पाहिजे. मुलांना भूक लागली की आपण असा पौष्टिक मसाला डोसा फटाफट बनवून देवू शकतो मग मुले सुद्धा खुश.
साहित्य:
1 कप पोहे
1/2 कप रवा
1 कप दही
मीठ चवीने
1 टे स्पून सांबर मसाला पाऊडर
1 कप शिमला मिर्च व कांदा बारीक चिरून
कृती: प्रथम पोहे व रवा मिक्सरमध्ये थोडे ब्लेंड करून घ्या, मग त्यामध्ये दही घालून व लागेल तसे पाणी घालून परत ब्लेंड करून घ्या.
एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या, त्यामध्ये मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा, त्यावर थोडेसे तेल लावून घ्या, एक मोठा डाव मिश्रण घेऊन नॉनस्टिक पॅन वर सोडा व हळुवार पणे मिश्रण पसरवून घ्या. बाजूनी थोडेसे तेल सोडून डोशावर सांबर मसाला भुरभुरा व बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर टाकून डोसा क्रिस्पि होऊद्या.
मग गरम गरम पोहा मसाला डोसा सांबर बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.