कोबी + अंडी ह्यांची नवीन रेसिपी ह्या अगोदर कधी पहिली नसेल | Cabbage Egg Fry
Tasty Different Style Cabbage Egg Fry Recipe In Marathi
आपण नेहमी कोबीची भाजी बनवताना फोडणी देवून चनाडाळ किंवा मुग डाळ टाकून हिरवी मिरची घालून बनवतो. किंवा लाल मिरची पावडर टाकून बनवतो.
पण आज आपण कोबीची अगदी निराळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत ते पण अगदी हेल्दी बनवणार आहोत. कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये आपण कांदा गाजर व अंडी घालून फ्राय करून बनवणार आहोत. जे नॉनव्हेज खातात किंवा जे एग लवर्स आहेत त्यांनी ही भाजी खूप आवडेल.
The Tasty Different Style Cabbage Egg Fry Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Different Style Cabbage Egg Fry
आपल्या कडे अचानक पाहुणे आले किंवा कोणती भाजी करायची ते समजत नसेल तेव्हा अश्या प्रकारची भाजी बनवा सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 1/2 कप कोबी (उभा पातळ चिरून)
2 अंडी
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा चिरून)
1 मध्यम आकाराचे गाजर (उभे पातळ चिरून)
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 /4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
3 टे स्पून तेल
मीठ चवीने
कोथिंबीर (चिरून)
कृती: प्रथम कोबी उभा पातळ चिरून धुवून घ्या, कांदा उभा चिरून घ्या, गाजर धुवून उभे चिरून घ्या. आल-लसूण कुटून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
एका पसरट पॅन मध्ये 2 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण घालून थोडे परतून चिरलेला कोबी व गाजर घालून मिक्स करून मोठ्या विस्तवावर 2-3 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून पॅन मध्ये एका बाजूला सरकवून घ्या. मोकळ्या भागामध्ये 1 टे स्पून तेल घालून 2 अंडी फोडून मध्यम विस्तवावर परतून घ्या, परतून झालीकी सर्व एकत्र करून 2 मिनिट परतून घ्या.
मग गरम गरम कोबी व अंडे भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.