Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style Recipe In Marathi

Chicken
Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style Recipe

Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style Recipe In Marathi

स्ट्रीट स्टाइल झटपट चिकन मसाला पाव एकदा असा बनवून पहा सगळे तारीफ करतील

महाराष्ट्रामध्ये पाव वापरुन बऱ्याच रेसिपी बनवल्या जातात. जसे आपण जेवणात चपाती जास्त प्रमाणात वापरतो तसेच पाव वापरुन सुद्धा छान रेसीपी बनवू शकतो. आपण बर्गर किंवा पावभाजी बनवतो.

आज आपण चिकन मसाला पाव ही एक चटपटी घरात सर्वाना आवडेल अशी डिश बनवणार आहोत. चिकन मसाला पाव ही डिश बनवायला सोपी झटपट होणारी व स्वादिष्ट आहे.

The Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style

नॉनव्हेज फूड लव्हर्सना चिकन मसाला पाव डिश खूप आवडेल. आपण ही डिश नाश्तासाठी किंवा जेवणात किंवा कुणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो. मसाला चिकन पाव साठी आपल्याला चिकन खीमा किंवा बोनलेस चिकन वापरायचे आहे.

बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी

साहित्य:
2 लादी पाव (16 पाव)
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
बटर पाव भाजण्यासाठी

चिकन करिता:
250 ग्राम बोनलेस चिकन किंवा खीमा
2 टे स्पून तेल
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 मध्यम आकाराची शिमला मिर्च
2-3 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला किंवा चिकन तंदुरी मसाला
1 टी स्पून ऑरेगॉनो
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून

हिरवी चटणी करिता:
2 कप कोथिंबीर (धुवून, चिरून)
1/2 कप पुदिना पाने (धुवून)
3 हिरव्या मिरच्या
1” आल तुकडा
5-6 लसूण पाकळ्या
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने

Chicken
Tasty Spicy Chicken Masala Pav Street Style

कृती: प्रथम चिकन खीमा धुवून चाळणीवर निथळत ठेवा, जर चिकन खीमा नसेलतर बोनलेस चिकन मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या, कांदा व कोथिंबीर चिरून घ्या, आल-लसूण कुटून घ्या, हिरवी मिरची चिरून घ्या,
हिरवी चटणी करिता: मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, लसूण, आल, हिरवी मिरची, लिंबूरस व मीठ घ्या, मग त्यामध्ये 1/4 वाटी पाणी घालून चटणी वाटून घ्या.

एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून 3-4 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून 2 मिनिट परतून घ्या, आता त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर व मीठ घालून मिक्स करून चिकन घालून मिक्स करून घ्या, आता पॅनवर झाकण ठेवून 15 मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या, मधून मधून झाकण काढून हलवून घ्या, जर मिश्रण खूप कोरडे वाटत असेलतर थोडेसे पाणी घाला.

चिकन शिजल्यावर त्यामध्ये गरम मसाला, ऑरेगॉनो, चिली फ्लेस्क, लिंबुरस व कोथिंबीर घालून मिक्स करून 2 मिनिट शिजवून विस्तव बंद करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.