Tasty Spicy Masoor Pulao For Kids Recipe In Marathi

Masoor Pulao
Tasty Spicy Masoor Pulao For Kids Recipe

टेस्टि हेल्दी मोड आलेल्या मसुरचा पुलाव मुलांच्यासाठी

Tasty Spicy Masoor Pulao For Kids Recipe In Marathi

मोड आलेले मसुर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. तसेच ते पचायला सुद्धा हलके असत्तात. आपण ह्या अगोदर मोड आलेल्या मसुरची आमटी निरनिराळ्या पद्धतीने कशी बनवायची टे पाहिले. आता आपण मोड आलेल्या मसुरचा पुलाव कसा बनवायचा ते पाहू या.

The Tasty Spicy Masoor Pulao For Kids Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Spicy Masoor Pulao For Kids

मोड आलेल्या मसुरचा पुलाव बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे स्वादिष्ट लागतो व सर्वाना आवडेल असा अगदी निराळा बनतो.

बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी

साहित्य:
1/2 वाटी मोड आलेले मसुर
1 वाटी तांदूळ
2 टे स्पून तेल
2 लवंग,1” दालचीनी तुकडा
6-7 मिरे, 2-3 तमालपत्र
1 टी स्पून जिरे
2 सुक्या लाल मिरची
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 छोटा टोमॅटो
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून ओले खोबरे (खोवून, कुटून)
मीठ चवीने
कोथिंबीर चिरून

Masoor Pulao
Tasty Spicy Masoor Pulao For Kids Recipe

कृती: प्रथम मसुर भिजवून त्याला मोड आणून घ्या. मग तांदूळ धुवून त्यामध्ये चवीने मीठ, थोडेसा लिंबुरस व 1 टी स्पून तेल घालून मोकळा भात शिजवून बाजूला ठेवा. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम झाले की त्यामध्ये मोड आलेले मसुर घालून 2 मिनिट शिजवून घेऊन बाजूला ठेवा. कांदा, टोमॅटो चिरून घ्या, आल-लसूण कुटून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.

एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचीनी, तमालपत्र, मिरे, सुक्या लाल मिरच्या घालून, चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून परतून टोमॅटो घाला मग लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून थोडेसे परतून मोड आलेले मसुर घालून 2 टे स्पून पाणी घालून पॅन वर झाकण ठेवा व 3-4 मिनिट मसूर शिजू द्या,

मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून मिक्स करून 5 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
आता गरमा गरम मोड आलेल्या मसुरचा भात सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.