Tasty Spicy Stuffed Karela | Chavista Chatpatit Bharlele Karale Recipe In Marathi
खूपच टेस्टि आरोग्यदायी भरलेले कारले अश्या पद्धतीने बनवा सर्वांना आवडेल
कारल्याची भाजी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. कारल्याची भाजी सेवन केल्याने तोंडाला छान चव येते. बरेच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही कारण की ते कडू असते. आपल्याला माहीत असेलच कारल्याची भाजी साखरेत घोळा नाहीतर तुपात घोळा ते कडुच लागते.
The Tasty Spicy Stuffed Karela | Chavista Chatpatit Bharlele Karale Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Spicy Stuffed Karela | Chavista Chatpatit Bharlele Karale
आज आपण कारल्याची मसाला भरून भाजी बनवणार आहोत ती आजिबात कडवट लागत नाही उलट खूप छान टेस्टि लागते. तुम्ही अश्या पद्धतीने भाजी बनवली तर घरात सगळ्याना आवडेल जे कारल्याची भाजी खात नाहीत ते सुद्धा कारल्याची भाजी खायला लागतील.
आपण कारल्याची भाजी बनवताना कारल्याचा वरचा भाग खरवडून काढतो मग तो टाकून देतो. पॅन तो भाग आपण कारले स्टफ करताना वापरणार आहोत करणकी की ते खूप पौष्टिक आहे. तसेच त्यामुळे भाजी मस्त लागते व कडवट सुद्धा होत नाही.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 मोठ्या आकाराची कारली
3 टे स्पून तेल
सारणासाठी:
सुका मसाला करिता:
1 टी स्पून धने
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून बडीशेप
1/4 टी स्पून कलोनजी
1/2 टी स्पून मेथी दाणे
सारणासाठी:
कारल्याची साल चिरून घ्या
1 मोठा कांदा (बारीक चिरून)
6-7 लसूण पाकळ्या ठेचून
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून चाट मसाला
1 टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
कृती: प्रथम कारली स्वच्छ धुवून पुसून घ्या, मग त्याची साल काढून बाजूला ठेवा, करल्याच्या आतील बिया काढून ठेवा व करल्याच्या मध्य भागी एक उभी चीर मारा म्हणजे आपल्याला त्यामध्ये सारण भरता येईल. कांदा बारीक चिरून घ्या, लसूण ठेचून बाजूला ठेवा. कारल्याची साल सुरीने थोडी कापून घेऊन त्याला थोडेसे मीठ लावून 5 मिनिट बाजूला ठेवा मग त्यातील पाणी थोडेसे दाबून काढा म्हणजे करल्याचा कडवट पणा कमी होईल.
साल काढलेली कारली घेऊन त्याला वरतून थोडेसे मीठ चोळून घ्या, मग एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर एक चाळणी ठेवून त्यावर कारली ठेवून झाकण ठेवा व 15 मिनिट मंद विस्तवावर कारली शिजवून घ्या.
एका पॅन मध्ये धने,जिरे, बडीशेप, कलोनजी व मेथी दाणे थोडे गरम करून घेऊन थंड झाल्यावर कुटून घ्या.
पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कारल्याची चिरलेली साल 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून 2 मिनिट परतून घेऊन ठेचलेला लसूण घालून 1 मिनिट परतून त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला व चाट पावडर घालून थोडेसे मीठ घालून मिक्स करून कोथिंबीर घालून थोडेसे लिंबुरस घालून मिक्स करून घ्या, आता सारण तयार झाले.
आता बनवलेले सारण वाफवलेल्या कारल्या मध्ये भरून घ्या वरतून दोऱ्याने गुडाळा म्हणजे सारण बाहेर पडणार नाही.
त्याच पॅनमध्ये तेल गरम करून कारली ठेवा व 5-7 मिनिट मंद विस्तवावर कारली उलट पालट करून परतून घ्या.
गरम गरम स्टफ कारली चपाती बरोबर सर्व्ह करा.