1 Teaspoon Oil Poha Suji Nashta For Kids Recipe In Marathi
इडली, डोसा, ढोकळा विसराल 1 चमचा तेलात हा नवीन टेस्टि नाश्ता बनवाल तर नेहमी बनवाल
आपण इडली डोसा ढोकळा नेहमी बनवतो तो सर्वाना खूप आवडतो. आज आपण असाच एक पदार्थ म्हणजेच डिश बनवणार आहोत ते सुद्धा वाफवून अगदी निराळी स्वादिष्ट आहे.
आपण पोहे व रवा वापरुनही डिश बनवणार आहोत त्यामध्ये बटाट्याचे सारण भरणार आहोत. इडली ढोकळा सारखे वाफवून घेणार व सॅंडविच सारखे त्यामध्ये सारण भरनार आहोत व त्याला 1 चमचा तेलात फ्राय करणार आहे की नाही निराळी डिश. एकदा करून पहा सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 कप पोहे
1 कप रवा
1/2 कप दही
2-3 हिरव्या मिरच्या
1” आले तुकडा
मीठ चवीने
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 छोटी शिमला मिरची
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1 टी स्पून मॅगी मसाला
1/2 टी स्पून काळे मीठ
1/2 टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
2 टे स्पून टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी
1 टे स्पून तेल
कृती: प्रथम पोहे दोन वेळा स्वच्छ पाण्यानि धुवून घ्या. मग चाळणीवर ठेवा म्हणजे त्यामधील पाणी निघून जाईन व पोहे मोकळे होतील. शिमला मिर्च चिरून घ्या, कोथिंबीर चिरून घ्या.
मिक्सरच्या जार मध्ये भिजवलेले पोहे, रवा, दही, हिरवी मिरची व आले तुकडा घालून अर्धी वाटी पाणी घालून ब्लेंड करून घ्या. मग त्याचे वेगवेगळे दोन भाग करा.
कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये एक स्टँड ठेवा. किंवा इडली पात्र मध्ये पाणी गरम करायला ठेवले तरी चालेल. एका प्लेट ला तेल लावून घ्या.
आता मिक्सर मधून ब्लेंड केलेला एक भाग घेऊन त्यामध्ये चवीने मीठ व इनो 1/2 टी स्पून घाला व इनो वर एक चमचा पाणी घालून मिश्रण एक सारखे मिक्स करून घेऊन मग तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून एक सारखे करून घ्या. मग प्लेट पाणी गरम केलेल्या कढई मध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवा व 12-15 मिनिट वाफवून घ्या.
एका बाउल मध्ये उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या, मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मॅगी मसाला, धने-जिरे पावडर, काळे मीठ, चिलीफ्लेस्क, शिमला मिर्च, कोथिंबीर मीठ व लिंबुरस घालून मिक्स करून घ्या.
आता 15 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून प्लेट खाली उतरवून थंड होऊ मग त्यावर टोमॅटो केचप लावून बटाट्याचे सारण पसरवून घ्या.
आता दूसरा ब्लेंड केलेला भाग घेऊन त्यामध्ये मीठ व सोडा घालून त्यावर एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्या मग मिश्रण बटाट्याच्या सारणावर पसरवून प्लेट परत गरम केलेला पाण्यात म्हणजे कढई मध्ये ठेवा त्यावर झाकण ठेवून 8 मिनिट वाफवून घ्या.
मग 8 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून प्लेट बाहेर काढून थंड होऊ द्या. मग त्याचे सुरीने प्रथम दोन भाग करा मग चार भाग करून म्हणजेच एक सारखे 8 त्रिकोणी भाग करा.
एक नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर एक चमचा तेल लाऊन त्रिकोणी भाग दोन्ही बाजूनी छान थोडेसे रंग बदले पर्यन्त गरम करून घ्या.
आता गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.