10 May 2024 Akshay Trititya Importance And Upay In Marathi
10 मे 2024 शुक्रवार अक्षय तृतीया महत्व व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय
अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो. वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथीच्या दिवशी हा दिवस साजरा करतात.
The 10 May 2024 Akshay Trititya Importance And Upay In Marathi be seen on our You tube Chanel 10 May 2024 Akshay Trititya Importance And Upay
अक्षय तृतीया शुभ मुहूर्त:
10 मे 2024 शुक्रवार सकाळी 4 वाजून 17 मिनिट ते
11 मे 2024 शनिवार 2 वाजून 50 मिनिट पर्यन्त
अक्षय तृतीया सोने-चांदी खरेदी मुहूर्त:
10 मे सकाळी 5 वाजून 33 मिनिट ते
दुपारी 12 वाजून 18 मिनिट पर्यन्त
अक्षय तृतीया ह्या दिवशी खूप चांगला योग आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र नुसार ह्या वर्षी 100 वर्षा नंतर गजकेसरी राजयोग आहे. तसेच अक्षय तृतीया ह्या दिवशी मालव्य योग, धन योग, रवियोग, उत्तम योग व शश योग असे पाच महा शुभ योग आहेत.
अक्षय तृतीया ह्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा-आराधना करतात त्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते. अक्षय तृतीयाला अबुझ मुहूर्त मानला जातो म्हणजे ह्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ मानला जातो व कोणत्या सुद्धा नवीन कामासाठी हा दिवस चांगला मानतात मुहूर्त बघायची गरज नसते. तसेच कोणते सुद्धा मंगल कार्य करू शकता.
अक्षय तृतीया ह्या दिवशी पूजा अर्चा व दान धर्म केल्याने अक्षय पुण्य मिळते. अक्षय तृतीया ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. तसेच ह्या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला पापा पासून मुक्ती मिळते. तसेच ह्यादिवशी पितृ श्राद्ध करण्याची प्रथा आहे.
अक्षय तृतीया उपाय:
* धनप्राप्ती साठी अक्षय तृतीया ह्या दिवशी आपल्या घरातील पूजाघरची साफसफाई करून भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची पूजा अर्चा करावी. त्याच बरोबर माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मी ला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पित करा. त्याच बरोबर खीर बनवून त्याचा नेवेद्य दाखवा. असे केल्याने आपल्या जीवनात धन प्राप्ती होऊन समृद्धी येते.
* माता लक्ष्मी ला एकाक्षी नारळ खूप आवडतो. असे म्हणतात की एकाक्षी नारळा मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. अक्षय तृतीया ह्या दिवशी एकाक्षी नारळ घेऊन लाल रंगाच्या कापडात बांधून आपल्या पूजा घरात स्थापित करा असे केल्याने घरातील व्यक्तिवर नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहील.
* आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी लाल रंगाच्या कापडात एकाक्षी नारळ बांधून तिजोरी मध्ये ठेवा अश्यामुळे आपल्या व्यापारात वृद्धी होईल. किंवा चांदीच्या डबीत मध व नागकेसर भरून तिजोरीत ठेवा.
* अक्षय तृतीया ह्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरण पादुका आपल्या पूजा घरात आणून ठेवल्याने माता लक्ष्मी लगेच प्रसन्न होते. ह्या दिवशी गरीब लोकांना अन्न, धन व वस्त्र दान करा. तसेच कवड्या पिवळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून तिजोरी मध्ये ठेवा.
* तुळशीच्या रोपात माता लक्ष्मीचा वास असतो. ह्या दिवशी आपल्या घरात तुळशीचे नवीन रोप लाऊ शकता. त्याच बरोबर तुळशीची पूजा करा व संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा. असे केल्याने धन व स्वास्थ संबंधित समस्यामध्ये लाभ होतो.
* भगवान विष्णु ह्यांना पिवळे फूल अर्पित करा त्याच बरोबर नेवेद्य मध्ये त्यांची अतिप्रिय तुळशी पत्र ठेवायला विसरू नका असे केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पुर्ण करतील.
Disclaimer: आम्ही ही माहिती फक्त आपल्या पर्यन्त पोचवण्यासाठी देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.