Amazing Aloo Samosa With Raita New Recipe In Marathi
मस्त लाजवाब आलु समोसा विथ रायता नवीन रेसीपी करून पहा सगळे आवडीने खातील
आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण इडली वडा, पोहे उपमा किंवा भजी बनवतो. आपण मटार बटाटा घालून समोसा बनवतो. आपल्या मुलांना सुद्धा रोज काहीना काही निराळे नाश्ता साठी हवे असते मग आपण डोके लढवतो मुलांसाठी आज निराळे काय बनवायचे.
The Amazing Aloo Samosa With Raita New Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Amazing Aloo Samosa With Raita New Recipe
आता पिझ्झा पास्ता खावून सुद्धा कंटाळा आला मग आज एक नवीन हेल्दी रेसीपी बनवली ती म्हणजे समोसा रायता. समोसा रायता ही एक हेल्दी रेसीपी आहे. तसेच ती टेस्टि लागते व झटपट बनते.
समोसा रायता ही डिश बनवताना समोसासाठी जे सारण बनवले आहे ते सुद्धा जरा निराळ्या पद्धतीने बनवले आहे. त्याच्या सोबत फ्रेश दही व बुद्धी वापरुन रायता बनवले आहे. ह्या दोन्ही चे कॉमबिनेशन खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा एकदा बनवून पहा सगळे आवडीने खातील.
समोसा रायता ही डिश बुनदेलखंड ह्या भागात बनवली जाते.
साहित्य:
समोसा आवरणांसाठी:
1 कप मैदा
2 टे स्पून तेल
मीठ चवीने
तेल समोसे तळण्यासाठी
समोसा सारणा करिता:
2 मोठ्या आकाराचे बटाटे
1″ आले (किसून)
3-4 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 टे स्पून तेल
1 टी स्पून बडीशेप
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/2 टी स्पून काळ मीठ
मीठ चवीने
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
रायता करिता:
1 वाटी दही
1 टे स्पून पिठीसाखर
मीठ चवीने
1/4 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
2-3 टे स्पून खारी बुंदी
सजावटी करिता:
लाल मिरची पावडर
चाट मसाला
कोथिंबीर चिरून
कृती: बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. फ्रेश दही घ्या. हिरव्या मिरच्या धुवून चिरून घ्या. आल किसून घ्या.
आवरणासाठी: एका बाउल मध्ये मैदा, मीठ व तेल मिक्स करून घ्या. मग लागेल तसे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून बाजूला ठेवा.
सारणासाठी: बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्या. एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये हिंग व बडीशेप घालून मग हिरवी मिरची व आले घालून थोडेसे परतून घ्या. मग त्यामध्ये धने-जिरे पावडर, काळे मीठ, मीठ चवीने व हळद घालून मिक्स करून घेवून त्यामध्ये बटाटे घालून कोथिंबीर व चिलीफ्लेस्क घालून मिक्स करून घ्या. मग मिश्रण दोन मिनिट परतून घेवून विस्तव बंद करा.
बुंदी रायतासाठी: एका बाउल मध्ये फ्रेश दही घेऊन थोडेसे फेटून घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर, मीठ, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर व कोथिंबीर
घालून मिक्स करून त्यामध्ये बुंदी घाला.
समोसे बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा गोळा घेवून त्याची मोठी चपाती लाटून घ्या. मग चपातीचे एकसारखे 8 त्रिकोणी भाग कापून घ्या. सारणाचे एक सारखे 8 गोळे बनवून घ्या. एक गोळा एका भागावर ठेवा. असे आठ गोळे आठ भागावर ठेवा. त्रिकोणी भागाला बाजूनी किंचित पाणी लावा व ते मुडपून समोसाचा आकार द्या. ( प्रथम बाजूची एकसारखी टोके जोडून घेऊन हळुवार पणे दाबून चिटकवून घ्या. मग वरचा भाग मुडपून घेऊन चिटकवून घ्या. अश्या प्रकारे सर्व समोसे बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल ह=गरम झालेकी त्यामध्ये समोसे छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व समोसे तळून घ्या.
समोसे सर्व्ह करताना 1-2 समोसे प्लेटमध्ये घेऊन ते मधोमध फोडून त्याच्यावर रायता घालून वरतून लाल मिरची पावडर, चाट मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.