Amazing Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle Recipe In Marathi

Idlimbu Pickle
Amazing Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle

इडलिंबू सेवनाचे आरोग्यदायी अनगिनत फायदे व इडलिंबूचे चटपटीत लोणचे बनवण्याची सोपी पद्धत

Amazing Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle Recipe In Marathi

इडलिंबू, इडलिंबू हा एक लिंबाचाच प्रकार आहे. जे भारतात उगवणारे एक आयुर्वेदिक झाड आहे. इडलिंबूचे झाड बरेच मोठे असते. इडलिंबू ही अत्यंत गुणकारी आहे त्याच्या सेवणाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. इडलिंबूच्या सेवनाने आपल्या शरीरातील बरेच आजार बरे होण्यास मदत होते.

The Amazing Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle

इडलिंबू सेवनाचे आरोग्यदायी अनगिनत फायदे:
आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते.
कोलेस्ट्रॉल मध्ये सुधारणा होते.
पचनशक्ती सुधारून शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते.
किडनीस्टोन होण्यापासून बचाव होतो.
इडलिंबूचा रसामध्ये वितामिन “C” आहे त्याच्या मुळे पचन शक्ति सुधारून अल्सर बरा होतो. तसेच आपल्या दातांच्या हिरड्या मधून रक्त येत असेलतर ते थांबते.
ताप, सर्दी, खोकला,हृदय संबंधित आजार, लिव्हर संबंधित आजार, मूत्र संदर्भातील आजार म्हणजेच जर युरीन इन्फेक्शन असेल व लघवीला वारंवार होत असेल.
जर तुम्हाला मूतखडा असेल किंवा मूतखडा, पिताशयचा आजार असेल किंवा
किडनी मध्ये मूतखडा असेल तर कोणत्याही प्रकारचा मूतखडा लवकर बाहेर पडण्यासाठी इडलिंबूचे सेवन करणे उपयोगी पडेल. असे म्हणतात की रात्री इडलिंबूमद्धे जर सुई टोचून ठेवली तर सकाळी उठून पाहिले तर सुईचे पुर्ण पणे पाणी झालेले दिसेल म्हणजेच इडलिंबू मध्ये एव्हडि शक्ति आहे. म्हणूनच जर मूतखडा झाला असेलतर तो विरघळण्यासाठी इडलिंबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

इडलिंबू मध्ये असा एक गुणधर्म आहे म्हणजेच असा एक घटक आहे की त्याच्या सेवनाने पिक्त वाढत नाही. जर BP चा त्रास नियमित होत असेलतर, शुगर वाढत असेलतर किंवा कमी होत असेलतर इडलिंबूचे सेवन करावे.
इडलिंबूचा वापर आपण अश्या प्रकारे करू शकता. एका इडलिंबूचे 3 भाग करा. आपण हे तीन भाग असे सुद्धा खाऊ शकतो. सालीसकट किंवा लिंबुचा रस काढून साखरे सोबत सुद्धा पिऊ शकतो. असे सेवन केल्याने मूतखडा 3 दिवसांत विरघळून शरीराच्या बाहेर पडून आराम मिळतो.

इडलिंबू वापरुन त्याच्या पासून मुरांबा बनवला जातो त्याच्या साली पासून तेल काढले जाते व त्याचा उपयोग बेकरी, थंड पेय किंवा कैंडीला स्वाद आणण्यासाठी केला जातो.

इडलिंबू वापरुन त्याच्या पासून मस्त चटपटीत लोणचे बनवतात व ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.

Idlimbu Pickle
Amazing Health Benefits of Idlimbu And How To Make Idlimbu Pickle

इडलिंबूचे आंबट-गोड लोणचे कसे बनवायचे:
साहित्य:
4 इडलिंबू
400 ग्राम गूळ पावडर
60 ग्राम तिखट
60 ग्राम मीठ
2 टे स्पून हिंग

कृती: प्रथम इडलिंबू स्वच्छ धुवून, पुसून घ्या. मग त्याचे 1” चे तुकडे करून घ्या. त्यामधील बिया काढून टाका.
एका मोठ्या आकाराच्या काचेच्या बाउलमध्ये इडलिंबूच्या फोडी, मीठ, तिखट, गूळ पावडर , व हिंग घालून एकसारखे मिक्स करून घ्या. प्रतेक फोडीला मसाला लागला पाहिजे.

मग काचेच्या बाऊलवर घट्ट झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवा. मग सकाळी लोणचे वरखाली करून स्वच्छ काचेच्या बरणीत भरून घ्या. बरणीचे झाकण घट्ट लाऊन 8-10 दिवस रोज उन्हात ठेवा.

लोणच्याची बरणी उन्हात ठेवण्याच्या अगोदर लोणचे एकदा वरखाली करून झाकण घट्ट लाऊन मग उन्हात ठेवा.

इडलिंबूचे लोणचे 8-10 दिवसांनी चांगले मुरेल मग लागेल तसे काढून परत बरणीचे झाकण घट्ट लाऊन ठेवा.

इडलिंबूचे लोणचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे.

इडलिंबूची माहिती आम्ही आपणा पर्यन्त पोचवण्यासाठी देत आहोत. जर हा उपाय करायचा असेलतर डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊन उपाय करू शकता.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.