घरात भाजी नाही बनवा टेस्टि स्पायसी बटाटा-बेसन रस्सा भाजी एकदम निराळी सगळे चाटून पुसून खातील
Batata-Besan Rassa Bhaji | Potato-Besan Gravy Different Recipe In Marathi
काही वेळेस काही कारणांनी घरात भाजी नसते किंवा बाजारात जाऊन भाजी आणायला वेळ मिळत नाही. मग काय करायचे हा प्रश्न पडतो. पण घरात कांदे-बटाटे-टोमॅटो असतातच तसेच घरात बेसन सुद्धा असते.
The Batata-Besan Rassa Bhaji | Potato-Besan Gravy Different Recipe In Marathican be seen on our You tube Chanel Batata-Besan Rassa Bhaji | Potato-Besan Gravy
मग आपण अश्या वेळ एक मस्त कांदा-बटाटा व टोमॅटो ची रस्सा भाजी बनवू या. अगदी निराळी रेसीपी आहे सगळे अगदी आवडीने खातील.
साहित्य:
बटाटे वडे बनवण्यासाठी:
2 बटाटे
1/2 वाटी बेसन
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हिंग
2 टी स्पून कोथिंबीर
2 टे स्पून कांदा
मीठ चवीने
तेल वडे तळण्यासाठी
साहित्य:
ग्रेव्ही साठी:
2 कांदे
1 टोमॅटो
7-8 लसूण पाकळ्या
2 लाल सुक्या मिरच्या
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
कृती: बटाट्याचे वडे: प्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. मग स्वच्छ धुवून पाणी काढून एका बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर, कांदा, हिंग घालून मिक्स करून बाजूला ठेवा. मीठ आपण शेवटी वडे तळताना घालायचे आहे म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही.
ग्रेव्हीसाठी: कांदे सोलून चिरून घ्या, टोमॅटो चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. मग मिक्सरच्या जार मध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल सुकी मिरची व लसूण घेऊन बारीक वाटून घ्या.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे व हिंग घालून वाटलेला कांदा-टोमॅटो घालून 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, मीठ घालून थोडेसे परतून घ्या. आता त्यामध्ये 1/2 कप पाणी घाला किंवा लागेल तसे पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवा व मसाला 3-4 मिनिट मंद विस्तवावर शिजवायला ठेवा.
एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या. किसलेल्या बटाटाच्या मिश्रणात मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे चपटे गोळे बनवून घ्या, गोळे स्टीम करून मग तळून घ्या, किंवा डायरेक्ट तेलात मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या.
ग्रेव्ही गरम झाली की त्यामध्ये तळलेली टिकी टाकून गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह कारा.