बटाट्याच्या कीसाचे पापड न लाटता चमच्यानी बनवा एकदम नवीन प्रकार करून पहा नक्की आवडेल
Batata Kees Papad Different New Style Recipe In Marathi
उन्हाळा सीझन आला की महिला वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतात. मग रोज काहींना काही म्हणजे कधी लोणच, पापद्म कुरडई बनवायची. मग आपल्याला वर्षभर असे पदार्थ पाहिजे तेव्हा तळून खाता येतात.
आज आपण बटाटा कीसाचे पापड अगदी नवीन पद्धत आहे त्या पद्धतीने बनवणार आहोत. बटाटाचे पापड आपण लाटून किंवा कोणते सुद्धा मशीन न वापरता बनवणार आहोत. टे सुद्धा आपण चमचा वापरुन पापड बनवणार आहोत आहे की नाही गंमत.
The Batata Kees Papad Different New Style Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Batata Kees Papad
बटाटा कीसाचे पापड बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 1 तास
वाढणी: 30 -35 पापड बनतात
साहित्य: 2 किलो बटाटे मोठ्या आकाराचे
मीठ चवीने
1 लिंबुरस
कृती: बटाटे स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग त्याची साल काढून पाण्यात ठेवा. मग मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. मग 3-4 पाण्यानि स्वच्छ धुवून घ्या म्हणजे बटाटा मधील स्टार्च निघून जाईल व बटाटे काळे होणार नाही.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात 4-5 ग्लास पाणी घ्या पाणी गरम झालेकी त्यामध्ये मीठ व लिंबुरस घालून मिक्स करून त्यामध्ये निमा बटाट्याचा कीस घालून 5 मिनिट मध्यम विस्तवावर शूजवून घ्या, मग झऱ्यांनी कीस काढून चाळणीमद्धे काढून ठेवा म्हणजे पाणी निथळून जाईल अश्या प्रकारे सर्व बटाट्याचा कीस वाफवून घ्या.
एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यावर 1 टे स्पून बटाट्याचा कीस घालून हळुवार पणे चमच्यानी पसरा व छोट्या आकाराचा पापड बनवून घ्या, पापड पसरवताना खूप जाड किंवा खूप पातळ पसरवायचा नाही मध्यम आकाराचा पसरवायचा. अश्या प्रकारे सर्व बटाट्याच्या कीसाचे पापड घालून झाल्यावर 2 दिवस छान उन्हात वाळवून घ्या. मग पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करा.
टीप: बटाटा कीस शिजला की नाही तेकसे ओळखेचे तर हातात थोडासा कीस घ्यायचा व मुडपून पहायचा बटाटा कीस तुटला नाही पाहिजे म्हणजे बटाटा कीस शिजला असे समजावे.