Delicious Mango Rabadi With Gulab Jamun Different New Recipe In Marathi
एकदम जबरदस्त मॅंगो रबडी विथ खव्याचे गुलबाजाम नवीन डेझर्ट रेसीपी सगळे आवडीने खातील
आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण आंब्याच्या नानाविध रेसीपी बनवू शकतो. उन्हाळा सीझन असल्यामुळे रोज आपल्याला काहीना काही थंडगार प्यावेसे वाटते.
आज आपण मॅंगो रबडी प्रथम बनवून घेणार आहोत मग आपण खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
The Delicious Mango Rabadi With Gulab Jamun Different New Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Delicious Mango Rabadi With Gulab Jamun
मॅंगो रबडी बनवताना दूध गरम करून थोडे आटवून साखर घालून वेलची पावडर घालून मिश्रण थंड झाल्यावर मॅंगो पल्प घालून ड्रायफ्रूट घालून थंड करून सर्व्ह करू शकतो.
मॅंगो रबडी बरोबर गुलाबजाम ही कॉम्बिनेशन खूप छान लागते. खव्या पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. खव्याचे गुलाबजाम जर आपण ह्या पद्धतीने बनवले तर अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे बनतात.
साहित्य:
रबडी बनवण्यासाठी:
2 आंबे पिकलेले
1/2 लीटर दूध
1/4 कप साखर
1/2 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटी करिता
गुलाबजाम बनवण्यासाठी:
100 ग्राम ताजा खवा
1 टे स्पून रवा
1 टे स्पून दूध
1 टी स्पून मैदा
तेल गुलाबजाम तळण्यासाठी
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
1 वाटी साखर
1 वाटी पाणी
1/2 टी स्पून वेलची पावडर
कृती: मॅंगो रबडी बनवण्यासाठी: आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून बाजूला ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा. . मग त्यामध्ये साखर घालून दूध 10-12 मिनिट आटवून घ्या, दूध आटल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून 2-3 मिनिट परत आटवून घ्या. मग विस्तव बंद करून दूध थंड होऊ द्या.
दूध थंड झाल्यावर त्यामध्ये मॅंगो पल्प घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या, मिश्रण चांगले मिक्स झाले की मग फ्रीजमध्ये 2 तास थंड करायला ठेवा.
खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे: प्रथम रवा व दूध मिक्स करून झाकून 2 तास बाजूला ठेवा म्हणजे रवा छान फुलून येईल.
एका प्लेटमध्ये खवा किसून घ्या, मग त्यामध्ये भिजवलेला रवा व एक चमचा मैदा घालून चांगले मिक्स करून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
एका बाजूला एका पॅन मध्ये साखर व पाणी मिक्स करून साखर विरघळवून घ्या, मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून साखर पुर्ण विरघळली की विस्तव बंद करून घ्या.
दुसऱ्या बाजूला तेल किंवा तूप गरम करायला ठेवा. तेल किंवा तूप गरम झालेकी बनवलेले गोळे छान ब्राऊन रंगावर तळून घ्या. सर्व गोळे तळून झालेकी गरम साखरेच्या पाकात घालून पॅन वर झाकण ठेवून 2 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या दोन मिनिट झालेकी विस्तव बंद करून गुलाबजाम थंड होऊ द्या.
आता मॅंगो रबडी विथ गुलाबजाम सर्व्ह करू या. मॅंगो रबडी छान थंड झाल्यावर त्यामध्ये गुलाबजाम घालायचे व ड्रायफ्रूट व आंब्याच्या फोडीनि सजवून सर्व्ह करायचे. तेव्हा गुलाबजाम मधील पाक हळुवारपणे दाबून काढून घायचा मग रबडीमध्ये सोडायचा.