कुरकुरीत बटाट्याचे पापड न लाटता अगदी निराळी पद्धत उपवासासाठी
Different Style Batata Papad For Fasting Recipe In Marathi
आता उन्हाळा आला की महिला वर्षभरासाठी लोणची पापड बनवून ठेवतात. मग उपवासाचे पापड, बटाटा कीस पण बनवून ठेवतात. आज आपण बटाट्याचे उपवासाचे पापड अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत ते पण न लाटता.
The Different Style Batata Papad For Fasting Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Different Style Batata Papad
बटाटा पापड बनवताना बटाटे उकडून किसकरून त्याचे पापड प्लॅस्टिक पेपरवर थापुन बनवले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 1 तास
वाढणी: 2 किलोचे पापड बनतात
साहित्य:
2 किलो बटाटे
1 चमचा जिरे
1 चमचा चिलीफ्लेस्क
1 चमचा मीठ
कृती: बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्या मग त्याची साल काढून गरम असतानाच किसणीने किसून घ्या.
मग हाताला थोडेसे तेल लाऊन बटाटे चांगले मळून घ्या. मग त्यामध्ये जिरे, लाल मिरची कुटलेली व मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
एक मोठा प्लॅस्टिक पेपर अंथरूण घ्या व एक छोटा प्लॅस्टिक पेपर घ्या, मोठ्या प्लॅस्टिक पेपरवर एक बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घेऊन त्यावर छोटा प्लॅस्टिक पेपर ठेऊन दाबून थोडेसे दाबून घ्या, किंवा त्यावर प्लेट ठेऊन दाबा म्हणजे आपोआप पापड पसरला जाईल. अश्या प्रकारे सर्व पापड बनवून घ्या.
मग उन्हात वाळवून डब्यात भरा पाहिजे तेव्हा तळून सर्व्ह करा.