Don’t Eat 3 Things With Mangoes In Marathi
आयुर्वेद नुसार आंब्याच्या बरोबर हे 3 पदार्थ सेवन केल्यास होईल अनर्थ
आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण जेवणात आंब्याचा रस काढून चपाती बरोबर सर्व्ह करतो किंवा आंब्या पासून विविध पदार्थ बनवतो.
आंबा हा फळांचा राजा आहे व वर्षभरातून आपल्याला फक्त एकदाच आंबा खायला मिळतो. तसेच आपण वर्षभर आंब्याची वाट पहात असतो. आंबा सर्वाना खूप आवडतो. आंबा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे म्हणजेच आरोग्यदायी आहे.
The Don’t Eat 3 Things With Mangoes Article In Marathi can be seen on our You tube Chanel Don’t Eat 3 Things With Mangoes
जेवतांना आंबा खाल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही. दुध मिक्स करून आंबा खाल्याने वीर्यवृद्धी चांगली होते.
आंबे खाणे म्हणजे आतड्यासाठी एक प्रकारचे उत्तम प्रकरचे औषध आहे. चांगला पिकलेला आंबा खाल्याने जठरातील पचनाचे रोग, फुफुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात.
चांगले पिकलेले आंबे खाल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते, आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणात होतो.
आंब्याच्या रसा मध्ये तूप मिक्स करून घेतल्याने पिक्ताचे प्रमाण कमी होते. तसेच आंब्याच्या रसात मध मिक्स केल्याने कफविकार दूर होतात.
आंब्याची पोळी ही गुणकारी आहे. त्यामुळे उलटी, वायू व पितत दूर होते.
आंब्याचे अती सेवन करणे हे हितावह नाही. कारण त्यामुळे अपचन होते. जर अपचन झाले तर पाण्या बरोबर सुंठेचे चूर्ण घेतल्याने फायदा होतो.
गोड आंब्याच्या रसात जीवनसत्व “ए “ व “सी” खूप प्रमाणात असते. जीवनसत्व “ए” जंतुनाशक असते. तर “सी” त्वचारोगहारक असते. कच्या कैरीत सायट्रिक व मोलिक असीड असते.
आयुर्वेद शास्त्रा नुसार आंब्याच्या सोबत काही पदार्थ सेवन करणे आपल्या शरीराला घातक आहेत. असे म्हणतात की फळ सेवन करताना एका वेळेस एकच फळ सेवन करावे.
आयुर्वेद नुसार आता आपण पाहू या आंब्या बरोबर कोणते पदार्थ खाणे वर्ज आहे.
आंब्याच्या बरोबर कधी सुद्धा संत्री, मोसंबी, केळी किंवा लिंबू खावू नये. कारण की असे खाणे हे कॉनट्रास होते त्यामुळे त्याचे पोटात साइड इफेक्ट होतात.
खरे म्हणजे आपण आंबा व दूध किंवा दही वापरुन काही डेझर्ट बनवतो व ही पदार्थ सगळे आवडीने खातात. पण आयुर्वेद मध्ये असे म्हंटले आहे की त्यामुळे पोटातील अग्निची पॉवर कमी होते, इनडायजेशन होते, पोटात गॅस निर्माण होतो तसेच शरीराचे वजन वाढून शरीरातील फॅट सुद्धा वाढतात.
आंब्या सोबत आंबट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कारण की त्यामुळे पिक्त वाढते.
आंब्या सोबत कधी सुद्धा चहा, कॉफी, कोल्डड्रिंक, घेऊ नये त्यामुळे पोटात दुखू शकते, उलटी होऊ शकते तसेच गॅस सुद्धा होऊ शकतो.
अजून एक महत्वाचे म्हणजे आंब्यासोबत कधी सुद्धा कारले सेवन करू नये. त्यामुळे उलटी होऊ शकते किंवा पोटात दुखू शकते.
आपण ह्या लेखात आयुर्वेद शास्त्रा नुसार आंब्या सोबत कोणते पदार्थ सेवन केल्याने काय होऊ शकते ते पाहिले पण मॉडर्न शास्त्रा नुसार ह्या गोष्टी बरेच जण मानत नाहीत. पण मानणे किंवा अमान्य करणे ही सर्वस्वी तुमच्या वर आहे.
आम्ही ह्या लेखात जी माहिती दिली आहे ती फक्त तुमच्या पर्यन्त पोचवण्या साठी दिली आहे त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.