रवा दुधात भिजवून एकदम नवीन पद्धतीने बिना पाक बिना मावा रव्याचे लाडू
Doodh Rava-Naral Ladoo Nahi Pak, Mawa Ekdam Navin Padhat Recipe In Marathi
आपण नेहमी रवा-नारळ लाडू बनवताना नेहमी तुपात रवा भाजून मग साखरेचा पाक बनवून लाडू बनवतो.
आज आपण अगदी नवीन पद्धतीने रवा नारळ लाडू बनवणार आहोत, ते सुद्धा दुधात रवा भिजवून, बिना पाकाचे, बिना मावाचे मऊ लुशलूशीत तोंडात टाकताच विरघळतील असे.
The Doodh Rava-Naral Ladoo Nahi Pak, Mawa Ekdam Navin Padhat In Marathi be seen on our You tube Chanel Doodh Rava-Naral Ladoo Nahi Pak, Mawa Ekdam Navin Padhat
आपण असे दुधात भिजवून रव्याचे लाडू खूप टेस्टि निराळे लागतात तसेच बनवायला सुद्धा सोपे व झटपट होणारे आहेत. आपण अश्या प्रकारचे लाडू सनावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10-12 लाडू
साहित्य:
1 कप रवा
1/4 कप नारळ (खोवून)
1 1/2 कप दूध
2 टे स्पून तूप
3/4 कप साखर
1/4 कप ड्रायफ्रूट (काजु-बदाम-किसमिस)
1 टी स्पून वेलची पावडर
कृती: एका बाउलमध्ये रवा व खोवलेला नारळ घेऊन मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये दूध मिक्स करून झाकण ठेवून 10-15 मिनिट बाजूला ठेवा.
एक पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट थोडे गरम करून घ्या. मग काढून बाजूला ठेवा. मग त्याच तुपामध्ये दुधामद्धे भिजवलेला रवा घालून मंद विस्तवावर कोरडा होई पर्यन्त परतून घ्या. रवा कोरडा झाला म्हणजे रवा छान मोकळा झाला की विस्तव बंद करून पॅन खाली उतरवून मिश्रण थोडे कोमट होई पर्यन्त ठेवा. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
आता कोमट झालेले मिश्रण एकसारखे करून घेऊन मग त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून चांगले मिक्स करून घ्या.
आता छान छोटे छोटे गोल गोल लाडू वळून घ्या. रवा नारळ लाडू जास्त दिवस टिकत नाहीत तर 2 दिवस झालेकी लगेच फ्रीजमध्ये ठेऊन 15 दिवस आपण खावू शकतो.