Healthy Moong Dal Idli For Kids Tiffin And Nasta Recipe In Marathi
15 मिनिटात हेल्दी मुग डाळ इडली बिना तांदूळ-उदिडदाळ मुलांच्या डब्यासाठी एकदम मस्त निराळी
इडली हा पदार्थ लहान मोठे सर्वाना आवडतो. सॉफ्ट इडली असेलतर पाहताच क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटते. आपण इडली बनवता नेहमी तांदूळ व उडीद डाळ बिजवून इडली बनवतो.
आज आपण मुगाच्या डाळीची झटपट इडली बनवणार आहोत. मुगाच्या डाळीची इडली बनवताना आपल्याला तासन तास आपण जसे डाळ-तांदूळ भिजवून परत वाटून 7-8 तास वाट पाहून इडली बनवतो तसे करावे लागत नाही ह्यामध्ये फक्त एक तास मुगाची डाळ भिजवून वाटून आपण लगेच इडली बनवू शकतो.
The Healthy Moong Dal Idli For Kids Tiffin And Nasta In Marathi be seen on our You tube Chanel Healthy Moong Dal Idli
आपण मुगाची इडली बनवताना त्यामध्ये गाजर किसून टाकू शकतो व त्यामध्ये तडका दिल्याने त्याची टेस्ट खूप मस्त लागते तसेच दही घातल्या मुळे इडली खूप सॉफ्ट बनते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 12 इडली बनतात
साहित्य:
1 कप मुगाची डाळ
1/3 कप रवा
1/4 कप दही
1 छोटे गाजर
मीठ चवीने
1/4 टी स्पून इनो किंवा बेकिंग सोडा
1 टे स्पून कोथिंबीर
तेल इडली स्टँडला लावण्यासाठी
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
कृती: मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक तास पाण्यात भिजत ठेवा. गाजर, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका बाउल मध्ये बारीक रवा व दही चांगले फेटून घ्या. मग मुगाच्या डाळी मधील पाणी काढून मिक्सर जार मध्ये काढून घेऊन बारीक वाटून घ्या.
मग रवा व वाटलेली मुगाची डाळ, गाजर,कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून घ्या.
फोडणी तयार करण्यासाठी तेल गरम करून मोहरी, जिरे,हिंग व कडीपत्ता घालून मिक्स करून घेऊन मिश्रणात फोडणी मिक्स करा.
इडली स्टँड मध्ये पाणी गरम करायला ठेवून प्लेट ला तेल लावून घ्या. आता बनवलेल्या इडलीच्या मिश्रणात इनो घालून लगेच त्यावर एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्या लगेच मिश्रण इडली स्टँड च्या प्लेट मध्ये घालून प्लेट इडली स्टँडमध्ये ठेवा. आता 15 मिनिट इडली ला वाफ येऊ ध्या.
गरम गरम इडली व चटणी सर्व्ह करा.