चमचमीत खुसखुशीत अळू वडी गुंडाळी करायला जमात नाही बनवा सोप्या पद्धतीने Alu Vadi Without Roll
Khamang Crispy Alu Vadi Without Roll Different Style Recipe In Marathi
आपण अळुवडी बनवतो व घरात सर्वाना आवडते सुद्धा. आपण सणावराला किंवा पाहुणे येणार असतीलतर किंवा इतर दिवशी सुद्धा अळूवडी बनवतो. अळुवडी बनवताना नेहमी काळ्या देठाची कोवळी पाने घ्यावी त्यामुळे वडीची छान लागते.
The Khamang Crispy Alu Vadi Without Roll Different Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Khamang Crispy Alu Vadi Without Roll Different Style
आपण अळुवडी बनवताना पानाला बेसन लावल्यावर त्याची घट्ट गुंडाळी करतो. पण काही जणांना पानाची गुंडाळी करायला जमत नाही. त्यामुळे आज
आपण पानांची गुंडाळी न करता आळुवडी कशी बनवायची ते पाहू या.
अळूवडी बनवताना पानांना लावायचे मिश्रण आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने व साहित्याने बनवणार आहोत.
साहित्य:
7-8 अळूची पाने (मध्यम आकाराची)
3/4 कप बेसन
7-8 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
2 हिरव्या मिरच्या
1//2 कप कोथिंबीर
2 टे स्पून चिंचेचा कोळ
2 टे स्पून गूळ
3/4 कप बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टे स्पून तीळ
मीठ चवीने
तेल अळुवडी तळण्यासाठी
कृती: प्रथम चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून घ्या. अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. लसूण सोलून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
मिक्सरच्या जार मध्ये कोथिंबीर, आल-लसूण-हिरवी मिरची, चिंच व गूळ घालून ब्लेंड करून घ्या. मग ब्लेंड केलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून घ्या, मग लागेल तसे पाणी घालून भजा सारखे पीठ भिजवून घ्या. एका स्टीलच्या चाळणीला तेल लावून घ्या. एक चाळणीच्या आकाराचे स्टील चे भांडे घेऊन त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून गरम करायला ठेवा.
चाळणीला तेल लावल्यावर चाळणीवर एक आळूचे पान ठेवा, पान ठेवताना शिरा असलेले बाजू वरच्या बाजूनी ठेवा म्हणजे त्या बाजूला आपल्याला बेसनचे मिश्रण लावता येईल. मग त्यावर दुसरे पान ठेवून त्यावर बेसन लावून घ्या, मग तिसरे पान ठेवून त्यावर बेसन लाऊन घ्या अश्या प्रकारे सर्व पाने ठेवून बेसन लावून घ्या, मग हळुवार पणे बोटांनी पाने दाबून घ्या. मग चाळणी पाणी गरम करायला ठेवलेल्या भांड्यावर ठेवा. चाळणीवर झाकण ठेवून मध्यम विस्तवावर 15 मिनिट पाने वाफवून घ्या.
आता 15 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून चाळणी मधील पाने पुर्ण पणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.
तेल गरम झालेकी वड्या छान तळून घ्या. आता गरम गरम आळूच्या वड्या सर्व्ह करा.