Kurkurit Moong Dal Pakoda Ekdam Nirale Recipe In Marathi
घरात बेसन नाही बनवा कुरकुरीत मुगडाळ पकोडे भजी अशी कधी बनवली नसेल बनवून पहा सगळे आवडीने खातील
आपण ह्या अगोदर निरनिराळ्या प्रकारची भजी कशी बनवायची ते पाहिले. आज आपण अजून एक नवीन पद्धत छान कुरकुरीत भजी ते पण मुगाच्या डाळीची कशी बनवायची. मुगाच्या डाळीची भजी छान टेस्टि लागतात. आपण अश्या प्रकारची भजी नाश्तासाठी किंवा इतर वेळी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकता.
The Kurkurit Moong Dal Pakoda Ekdam Nirale In Marathi be seen on our You tube Chanel Kurkurit Moong Dal Pakoda Ekdam Nirale
कधी कधी घरात बेसन संपते किंवा नसते व आपल्याला भजी बनवायची आहेत तर मुगाच्या डाळीची भजी बनवून पहा छान कुरकुरीत बनतात. त्यासाठी आपल्याला फक्त 2-3 ट्रिक्स आचरणात आणायच्या आहेत. अश्या प्रकारची मूगडाळ वापरुन भजी बनवली तर पाहुणे काय घरातील लोकसुद्धा म्हणतील ह्या अगोदर का नाही बनवली कीती मस्त लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 कप मूगडाळ
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
2 टे स्पून तांदळाचे पीठ
1 मध्यम आकाराचा बटाटा (किसून)
1” आल तुकडा
4-5 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून चाट मसाला
1/4 टी स्पून हिंग
1/4 कप कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल पकोडे तळण्यासाठी
कृती: प्रथम मूगडाळ स्वच्छ धुवून 2-3 तास भिजत ठेवा. कांदा चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या. बटाटा सोलून किसून 2 वेळा पाण्यानि धुवून घ्या मग त्यातील सर्व पाणी पिळून काढा.
मग 2-3 तासांनी मूगडाळ मधील सर्व पाणी काढून मिक्सरच्या जार मध्ये घ्या, त्यामध्ये हिरवी मिरची व आल चिरून घाला मग थोड जाडसर वाटून घ्या.
आता वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊन हातानी किंवा चांगले फेटून घ्या, साधारण पणे 2-3 मिनिट फेटा म्हणजे डाळीचे मिश्रण छान हलके होईल. मग त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हिंग, चिली फ्लेस्क, चाट मसाला, हिंग, मीठ व तांदळाचे पीठ घालून किसलेला बटाटा त्यातील सर्व पाणी काढून मिक्स करून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल चांगले गरम झालेकी छोटी छोटी भजी घालून छान कुरकुरीत तळून घ्या.
आता गरम गरम मुगडाळीची भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.