Maharashtrian Style Tasty Lajawab Kanda Batata Poha Unique Style Recipe In Marathi
कांदा बटाटा पोहे नेहमी बनवत असाल पण अश्या पद्धतीने नक्कीच बनवले नसतील एकदा बनवा सगळे आवडीने खातील
कांदा पोहे ही लहान मोठे सर्वाना आवडतात. आपण नाश्तासाठी किंवा मुलांना डब्यात किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा अचानक पाहुणे आले तर आपण कांदा पोहे बनवतो.
The Maharashtrian Style Tasty Lajawab Kanda Batata Poha Unique Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Maharashtrian Style Tasty Lajawab Kanda Batata Poha
पोहे आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवतो. कधी आपण बटाटा किंवा शेगदाणे किंवा मटार घालून बनवतो. बरेच वेळा पोहे जास्त भिजले जातात किंवा कधी कमी भिजले जातात त्यामुळे खाताना त्याची एकदम टेस्ट बदलते. तुम्ही बटाटा पोहे नेहमी बनवत असाल पण अश्या पद्धतीने कधी बनवले आहेत का तर जरूर बनवा सगळे आवडीने खातील
आज आपण पोहे अगदी छान मोकळे व टेस्टि कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप जाड पोहे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 छोटा बटाटा
3 हिरव्या मिरच्या
1/4 वाटी शेंगदाणे
1 छोटे लिंबू
1/4 कप कोथिंबीर (चिरून)
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हळद
10-12 कडीपत्ता पाने
कृती: एका बाउलमध्ये पोहे घेऊन 2 वेळा स्वच्छ पाण्यानि धुवून घ्या. मग पाणी पुर्ण काढून बाउल बाजूला ठेवा मग 5-7 मिनिट झाल्यावर बोटांनी पोहे वरखाली करून मोकळे करून घ्या.
कांदा सोलून चिरून घ्या, बटाटा सोलून मध्यम आकारचे तुकडे करून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या, हिरव्या मिरच्या धुवून चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून प्रथम शेंगदाणे छान तळून घेऊन बाजूला ठेवा. मग त्याच तेलामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता व चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, मीठ, साखर व लिंबुररस घालून मिक्स करून 1/4 वाटी पाणी घालून एक उकळी येवू द्या.
मग त्यामध्ये भिजवलेले पोहे व चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून झाकण ठेवा व एक छान दणदणीत वाफ येऊ द्या.
पोह्याला चांगली वाफ आली की त्यावर चिरलेली कोथिंबीर व तळलेले शेंगदाणे घालून गरम गरम बटाटा कांदा पोहे सर्व्ह करा.