चमचमीत स्वादिष्ट कोंकणी स्टाइल कोळंबी रस्सा एकदा खाल तर नेहमी कराल
Spicy Konkani Style Prawn Curry Kolmbi Gravy Recipe In Marathi By Royal Chef Sujata
कोकण भाग म्हंटले की आपल्या समोर येतो अथांग सागर व कोकण भागातील ताजे तवाने झिंगे किंवा मासे डोळ्या समोर येतात. कोकणमध्ये नारळ सुद्धा बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. ओला नारळ वापरुन माशीची आमटी किंवा कोळंबीची आमटी बनवली जाते.
The Spicy Konkani Style Prawn Curry Kolmbi Gravy Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Spicy Konkani Style Prawn Curry Kolmbi Gravy
आज आपण झिंगे म्हणजेच कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत. कोळंबीची आमटी बनवताना ओला नारळ खोवून वापरला आहे. त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. कोंकणी पद्धतीने रस्सा बनवायला अगदी सोपा आहे.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम कोळंबी (सोलून)
1 टे स्पून तेल
1 मध्यम आकाराचा कांदा
1 छोटा बटाटा (सोलून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
मसाला करिता:
1 टे स्पून तेल
2 टे स्पून कांदा
8-10 लसूण पाकळ्या
1 ” आल
1 कप ओला नारळ (खोवून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
कृती: कोळंबी सोलून स्वच्छ धुवून घ्या, कांदा चिरून घ्या, टोमॅटो धुवून चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. नारळ खोवून घ्या. बटाटा सोलून चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा, आल-लसूण घालून थोडा परतून घ्या, मग त्यामध्ये खोवलेला ओला नारळ घालून थोडा परतून घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून एक मिनिट परतून विस्तव बंद करा. मग मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून थोडा परतून त्यामध्ये चिरलेला टोमॅटो व बटाटा घालून 2 मिनिट परतून त्यामध्ये कोळंबी घालून 2-3 मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ व वाटलेला मसाला घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये 1 कप पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 10-12 मिनिट शिजू घ्या. मग झाकण काढून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
आता गरम गरम कोळंबी रस्सा चपाती, भाता बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.