2 आंब्यापासून झटपट लाजवाब मॅंगो रबडी व मॅंगो मटका कुल्फी अगदी निराळी पद्धत
Sweet Delicious Mango Rabadi And Mango Matka Kulfi Different Style Recipe In Marathi
आता आंब्याचा सीझन चालू आहे. आपण आंबा वापरुन निरनिराळे डेझर्ट बनवू शकतो. आज आपण 2 आंबे वापरुन त्यापासून मॅंगो रबडी व मॅंगो रबडी पासून मॅंगो मटका कुल्फी कशी बनवणार आहोत.
The Sweet Delicious Mango Rabadi And Mango Matka Kulf Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Mango Rabadi And Mango Matka Kulf
मॅंगो रबडी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे त्यासाठी फक्त फूल क्रीम दूध, साखर व मॅंगो पल्प वापरला आहे व वेलची पावडर व ड्रायफ्रूट घातले आहेत व त्यापासूनच मॅंगो मटका कुल्फी सुद्धा बनवली आहे.
साहित्य:
2 पिकलेले आंबे
1 लीटर दूध
1/4 कप साखर
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटी करिता
3 छोटे मटके कुल्फीसाठी
कृती: मॅंगो रबडी: प्रथम जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करायला ठेवा, दूध गरम झाले की मंद विस्तवावर 10-15 मिनिट आटवून घ्या मग त्यामध्ये साखर, वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून परत 2 मिनिट आटवून घ्या.
दूध आटले की थंड करायला ठेवा. आंबे सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.
दूध चांगले थंड झालेकी त्यामध्ये आंब्याच्या ब्लेंड केलेला ज्यूस घालून हळुवारपणे मिक्स करा.
मग फ्रीजमध्ये थंड करून थंडगार मॅंगो रबडी सर्व्ह करा.
मॅंगो मटका कुल्फी: मॅंगो रबडी तयार झाली की मातीची छोटी मटकी घेऊन त्यामध्ये मॅंगो रबडी घालून फ्रीजरमद्धे सेट करायला ठेवा.
मॅंगो मटका कुल्फी सेट झाली की सर्व्ह करा.