10 मिनिटात एकदम भन्नाट टेस्टी बटाटा व पोह्याचा पराठा मुलांच्या नाश्त्यासाठी मिनिटात संपेल
Tasty Healthy Batata W Pohyacha Paratha Mulanchya Nashta Sathi Recipe In Marathi
आपण कच्चा बटाटा व पोहे वापरुन त्याचा पराठा कधी बनवला आहे का? बनवून पहा नक्की आवडेल मुलांना तर खूप आवडेल. तसेक पोहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत.
बटाटा व पोहे ह्याचा पराठा बनवताना पोहे भिजवायची गरज नाही. पोहे कापडानी पुसून घेऊन मग मिक्सर मधून बारीक वाटून घेऊन त्यामध्ये कच्चे बटाटे व काही मसाले घालून मस्त टेस्टि झटपट पराठे बनवता येतात. तसेच मुलांना भूक लागली व त्यांना काही निराळे खावेसे वाटले तर अश्या प्रकारचा पराठा बनवता येऊ शकतो.
The Tasty Healthy Batata W Pohyacha Paratha Mulanchya Nashta Sathi In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Healthy Batata W Pohyacha Paratha
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 पराठे बनतात
साहित्य:
1 कप पोहे
2 मध्यम आकाराचे बटाटे
3-4 हिरव्या मिरच्या
1” आले
1 टी स्पून जिरे
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टे स्पून तेल
मीठ चवीने
तेल पराठा भाजण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे सोलून चिरून स्वच्छ पाण्यानि धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पोहे घेऊन ब्लेंड करून घ्या. आता पोह्याचे पीठ बाजूला काढून ठेवा. त्याच मिक्सर जार मध्ये बटाटे, हिरवी मिरची आले व जिरे पाणी न घालता वाटून घ्या.
मग वाटलेले मिश्रण व पोह्याचे पीठ एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ व तेल घालून मिक्स करून घ्या, गरज पडली तरच 1 टे 2 टे स्पून पाणी वापरा. आपण जशी चपातीसाठी कणिक मळतो तसे पीठ मळून घेऊन झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा.
तवा गरम करायला ठेवा तव्याला तेल लाऊन घ्या. मग मळलेल्या पिठाचे एक सारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन लाटून घ्या. मग तव्यावर तेल घालून छान खमंग भाजून घ्या.
गरम गरम पोह्याचा पराठा सॉस बरोबर सर्व्ह करा.