एकदा भेंडीची भाजी मिरचीचा ठेचा घालून बनवा सगळे मागे लागतील अशीच भेंडीची भाजी बनव
Tasty Spicy Bhindi Thecha Fry Bhaji Different Style Recipe In Marathi
भेंडीची भाजी मुले अगदी आवडीने खातात. मुले काय व मोठे सुद्धा आवडीने खातात. आपण ह्याअगोदर भेंडीची भाजी 2-3 प्रकारे कशी बनवायची ते पाहिले.
आज आपण भेंडीची भाजी अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. भेंडीची भाजी बनवताना आपण मिरचीचा ठेचा वापरणार आहोत. त्यामुळे भाजी खूप टेस्टि लागते. आपल्याला वाटेल की मिरचीचा ठेचा वापरला तर भाजी कीती तिखट होईल. पण भाजी तिखट होत नाही कारणकी आपण त्याच्या बरोबर ठेचा बनवताना शेंगदाणे व लसूण वापरणार आहोत त्यामुळे भाजी खूप टेस्टि बनते.
The Tasty Spicy Bhindi Thecha Fry Bhaji Different Style Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Bhindi Thecha Fry Bhaji
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
250 ग्राम भेंडी
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने -जिरे पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून आमचूर पावडर
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
ठेचा बनवण्यासाठी:
1 चमचा तेल
7-8 लसूण पाकळ्या
2-3 हिरव्या मिरच्या
1/4 वाटी शेंगदाणे
कोथिंबीर
कृती: प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याची देठ काढून चिरून बाजूला ठेवा. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. लसूण सोलून, मिरची चिरून घ्या. कांदा सोलून चिरून घ्या.
ठेचा बनवण्यासाठी: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण व हिरवी मिरची घालून थोडीशी परतून घ्या. मग त्यामध्ये शेंगदाणे घालून 2-3 मिनिट मंद विसत्ववावर परतून घ्या, थंड झाल्यावर खलबत्ता मध्ये किंवा दगडी मध्ये खुटून घेऊन बाजूला ठेवा.
पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घाला. कांदा थोडासा परतून त्यामध्ये हळद घालून चिरलेली भेंडी घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, भेंडी परतून शिजली की त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. आता त्यामध्ये कुटलेला ठेचा घालून मिक्स करून आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालून 2 मिनिट परतून घ्या.
गरम गरम भेंडी ठेचा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.