Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji Different Type Recipe In Marathi

cauliflower sabji bhaji
Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji

Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji Different Type Recipe In Marathi

एकदा गोबीची भाजी अश्या प्रकारे बनवा सगळे बाटे चाटत खातील चिकन मटन पनीर विसरून जाल

मुले भाजी खायचा कंटाळा करतात पण आपण जर हॉटेल किंवा ढाबा स्टाइल भाजी बनवली की मिनिटात संपवतात. आज आपण कॉलिफ्लॉवर ची भाजी ढाबा स्टाइल बनवणार आहोत. खूप छान टेस्टि लागते.

The Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji Different Type Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji

कॉलिफ्लॉवरची भाजी बनवताना कॉलिफ्लॉवरच तुरे काढून त्याला मैरीनेट करून मग त्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे त्याची टेस्टि अगदी स्वादिष्ट लागते. तसेच त्याची ग्रेवि सुद्धा छान चमचमीत स्पायसी दिसते पण खाताना तिखट लागत नाही. त्याचा रंग सुद्धा मस्त येते.

कॉलिफ्लॉवर ची अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. आपण घरी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो सगळे आवडीने खातील.

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी

साहित्य:
मैरीनेट करण्यासाठी:
250 ग्राम कॉलिफ्लॉवर तुरे
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून धने जिरे पावडर
1/2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून कसूरी मेथी
2 टे स्पून बेसन
मीठ चवीने

साहित्य ग्रेव्हीसाठी:
1 मोठ्या आकाराचा कांदा
1 मोठ्या आकाराचा टोमॅटो
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1/4 वाटी हिरवे ताजे मटार
1/2 वाटी दही
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने जिरे पावडर
1 टी स्पून कसूरी मेथी
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने

फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
2 लवंग, 1 तमालपत्र, 7-8 मिरे, 1 दालचीनी तुकडा
3-4 हिरवे वेलदोडे 1 टी स्पून जिरे

cauliflower sabji bhaji
Tasty Spicy Dhaba Style Gobi Sabji Cauliflower Chi Bhaji

कृती: प्रथम कॉलिफ्लॉवरचे तुरे कापून घ्या. मग चांगले धुवून घ्या. एका बाउल मध्ये तुरे घेवून त्यामध्ये हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, कसूरी मेथी व मीठ घालून मिक्स करून घेऊन झाकून बाजूला ठेवा.
कांदा बारीक चिरून घ्या, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.

एका बाउलमध्ये दही, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर घालून मिक्स करून बाजूला ठेवा.

कढईमध्ये किंवा पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कॉलिफ्लॉवरचे तुरे तळून घेऊन बाजूला ठेवा. मग त्याच पॅनमध्ये अजून थोडेसे तेल घालून लवंग, दालचीनी, मिरे, तमालपत्र, हिरवे वेलदोडे व जिरे घालून चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यामध्ये दही घालून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो पयूरी घालून 2-3 मिनिट परतून घ्या.

आता त्यामध्ये तळलेले कॉलिफ्लॉवरचे तुरे घालून मीठ, गरम मसाला व कसूरी मेथी घालून परत 2 मिनिट परतून 1 कप किंवा 1 1/2 कप गरम पाणी घालावे. किंवा आपल्याला ग्रेव्हीचा जसा थिकनेस हवा असेलतसे पाणी घालावे. मग कढई किंवा पॅनवर झाकण ठेवून 5 मिनिट मिडियम फ्लेमवर भाजी शिजवून घ्या.

मग गरम गरम भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करावी.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.