घरात फक्त शिमलामिर्च व कांदा होता त्याने इतकी मस्त ढाबा स्टाइल टेस्टि भाजी बनली की कढई पनीर सुद्धा फेल
Tasty Spicy Shimla Mirchi-Kanda Bhaji | Capsicum-Onion Bhaji Dhaba Style Recipe In Marathi
आपल्या घरात बरेचवेळा भाजी शिल्लक नसते पण कांदे बटाटे तर नक्की असतात. आज माझ्याकडे बटाटे नाहीत कांदे व शिमलामिर्च आहे मग आपण त्यापासून आपण एक मस्त ढाबा स्टाइल मस्त टेस्टि भाजी बनवणार आहोत.
The Tasty Spicy Shimla Mirchi-Kanda Bhaji | Capsicum-Onion Bhaji Dhaba Style Recipe In Marathi be seen on our You tube Chanel Tasty Spicy Shimla Mirchi-Kanda Bhaji | Capsicum-Onion Bhaji
शिमला मिर्च कांदा भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच मस्त चमचमीत व टेस्टि लागते. आपण इतर वेळी सुद्धा अश्या प्रकारची भाजी बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारची भाजी आपण बनवू शकता सगळे अगदी आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 मोठ्या आकाराच्या शिमला मिर्च
2 मध्यम आकाराचे कांदे
1 मोठा टोमॅटो
1कप दही
1/2 कप बेसन
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून कसूरी मेथी
1 चमचा तेल
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
2 हिरवे वेलदोडे
1/2 टी स्पून ओवा
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
2-3 हिरव्या मिरच्या चिरून
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
कोथिंबीर
कृती: प्रथम शिमला मिर्च धुवून त्याचे मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या, कांदा सोलून त्याचे पॅन मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. टोमॅटो चिरून घ्या, आल-लसूण कुटून घ्या.
एका बाउल मध्ये दही, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, मीठ, कसूरी मेथी व बेसन मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली शिमलामिर्च व कांदा घालून मिक्स करून झाकून बाजूला ठेवा.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवे वेलदोडे, ओवा व हिंग घालून आल-लसूण-हिरवी मिरची घालून एक मिनिट परतून त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घेऊन 1/2 कप पाणी घालून एक उकळी येवू द्या. उकळी आली की त्यामध्ये दह्यामध्ये भिजवलेली शिमलामिर्च व कांदाचे मिश्रण घाला. व हळुवार पणे मिक्स करून 2-3 मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या.
आता त्यामध्ये 1/2 कप पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 5-7 मिनिट भाजी शिजवून घ्या.
गरम गरम शिमलामिर्च-कांदा ढाबा स्टाइल भाजी जिरा राईस बरोबर सर्व्ह करा.