21 जुन शुक्रवार 2024 वटपूर्णिमा वटसावित्री व्रत तिथी,पूजा साहित्य,कोणत्या रंगाची साडी घालावी व महत्व
21 June 2024 Vatpurnima Vatsavitri Vrat Tithi Puja Vidhi And Mahatva In Marathi
जेष्ट महिना आला की महिलांना वटपूर्णिमा ह्या सणाचे वेद लागतात. वटपूर्णिमा ह्या दिवशी महिला उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आपल्या विवाहिक जीवनातील येणाऱ्या समस्या पासून मुक्ती मिळण्यासाठी करतात. वटपूर्णिमा हा सण विवाहित महिला साजरा करतात.
वटपूर्णिमा ह्या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वडाच्या झाडांमद्धे ब्रह्मा-विष्णु-महेश ह्याचा वास आहे.
वटपूर्णिमा तिथी:
21 जुन 2024 शुक्रवार सकाळी 7:31
22 जुन 2024 शनिवार सकाळी 6:37 पर्यन्त
पूजा साहित्य:
आज काल वेळे अभवी आपल्याला वडाच्या झाडा जवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेलतर घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून कुंडीमद्धे लावून, कुंडी पाटावर ठेवून, कुंडीवर स्वस्तिक काढून पाटा भोवती रांगोळी काढून पूजा करू शकता. जर शक्य असेलतर वडाच्या झाडा जवळ जावून पूजा करू शकता.
एक स्टीलची प्लेट किंवा ताट, पाण्याचा गडू, हळद-कुंकूची कोयरी, तुपाच्या फुल वातीचे निरांजन, पान-सुपारी-कॉईन, पंचामृत, साखर, कापसाची माळ, अगरबत्ती, गूळ-खोबरे, कापुर, सूती धागा गुंडाळण्यासाठी, ओटीचे सामानमध्ये ब्लाऊज पीस, गहू, आंबा, फुल
वटपूर्णिमाच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी:
वटपूर्णिमा ह्या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दाग दागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात. पण ह्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी लाल, हिरवी, पिवळी, नारंगी, जांभळी, निळी, केशरी नेसावी. पण चुकून सुद्धा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसु नका. आपण ज्या रंगाची साडी नेसाल त्या रंगाच्या बांगड्या घालू शकता.
वडाच्या झाडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी:
वडाच्या झाडा जवळ जावून प्रथम गडु मधील पाणी घालावे, हळद-कुंकू वहावे, ओटी भरावी, प्रसाद म्हणून पंचामृत, साखर , आंबा केळी ठेवावी, मग सूती धागा घेऊन वडाच्या फांदीमध्ये अडकवावा व 3 किंवा 5 प्रदक्षिणा हातात धागा घेवून माराव्या.
पूजा झाल्यावर प्रार्थना करावी की आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे तसेच आपल्या विवाहित जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण व्हावे.
वटपूर्णिमा महत्व:
वटपूर्णिमा ह्या दिवशी सावित्रीनी आपले पती सत्यवान ह्यांचे प्राण यमराज ह्यांच्या कडून परत आणले होते. वडाच्या झाडांमद्धे ब्रम्हा विष्णु महेश ह्याचा वास आहे व वडाचे झाड हे दीर्घायुषी आहे तसेच वडाच्या फांद्यामद्धे सावित्रीचा वास आहे. ह्या दिवशी काही जण संपूर्ण दिवस उपवास करतात काही जणी पूजा होई पर्यन्त उपवास करून गोडाचा स्वयंपाक करून नेवेद्य दाखवून उपवास सोडतात. वटपूर्णिमाचे व्रत व पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.