चहामध्ये एक चिमुट मीठ घालून बनवा हेल्दी ड्रिंक व पहा आरोग्यदायी चमत्कारी फायदे
Amazing Health Benefits of Salt Tea In Marathi
चहा मध्ये एक चिमुट मीठ घालून बनवा हेल्दी ड्रिंक त्यामुळे इम्युनिटी होईल बूस्ट, दूर होईल गळ्याची खवखव!
देशभरात लोक चहा अगदी आवडीने पितात व चहा पिणे हा आपल्या
आयुष्याचा एक भागच झाला आहे. ज्यांना चहा प्यायची सवय असते त्यांना चहाची वेळ झाली की अगदी अस्वथ होते. चहा मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत व प्रतेक जण आपल्याला पाहिजे तसा चहा बनवून पित असते.
खर म्हणजे चहा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसतो. त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होते.
आपल्याला काळे मीठ माहीत असेलच काळ्या मीठामध्ये भरपूर मिनरल्स असतात ते खूप गुणकारी आहे. टे थोडे गुलाबी रंगाचे असते व थोडे आंबट असते.
आपण चहा मध्ये मीठ घालून चहा कधी पिला आहे का? का बर आशचर्य वाटले ना. आपल्याला आइकायला सुद्धा विचित्र वाटले असेल. पण चहा मध्ये एक चिमुट काळे मीठ घातल्याने चहा खूप गुणकारी बनतो. तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह सुद्धा आहे.
चहा मध्ये एक चिमुट मीठ घालून ते एक हेल्दी ड्रिंक बनते. आता आपण पाहूया चहा मध्ये मीठ घालून चहा कसा बनवायचा व त्याचे काय फायदे आहेत.
1. इम्यूनिटी बूस्ट करते: मीठ घालून चहा सेवन केल्याने आपल्या शरीराची इम्यूनिटी मजबूत बनते व इम्यूनिटी मजबूत झाली की शरीराच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते.
2. शरीराचे वजन कमी होते: चहा मध्ये एक चिमुट मीठ घातल्याने चहाचा स्वाद वाढतो. त्याच बरोबर शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते व वजन कमी होण्यास मदत मिळते. चहा मध्ये काळे मीठ घालून सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
3. घशातील खवखव दूर होते: चहा मध्ये मीठ घालून सेवन केल्यास सर्दी-खोकला, गळ्यातील कफ संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
4. डोकेदुखी पासून आराम मिळतो: जर आपल्याला डोकेदुखीचा त्रास आहे व त्या समस्या पासून आपण परेशान आहात. तर आपण मीठ घालून चहा सेवन करू शकता. त्यामुळे सीरदर्द च्या समस्या पासून आपल्याला आराम मिळू शकतो.
5.मीठ घालून चहा कसा बनवायचा:
चहा बनवण्यासाठी साखर, चहा पावडर, दूध व काळे मीठ पाहिजे. आपण चहा बनवताना बिन साखरेचा किंवा बिना दुधाचा चहा बनवू शकता.