मस्त कुरकुरीत पूनुगुळू अगदी नवीन रेसिपी करून पहा इडली-डोसा बॅटर असले तर लगेच बनवायला घ्या
Crispy Punugulu With Idli Dosa Batter For Nashta Recipe In Marathi
पूनुगुळू ही एक नवीन रेसिपी आहे त्याचे नाव सुद्धा मजेशीर वाटते ना. पूनुगुळू ही रेसिपी बनवताना इडली-डोसासाठी आपण जे पीठ वापरतो ते वापरुन बनवले आहे. पूनुगुळू ही एक आंध्रप्रदेश मधील लोकप्रिय डिश आहे.
The Crispy Punugulu With Idli Dosa Batter For Nashta Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Crispy Punugulu With Idli Dosa Batter
पूनुगुळू हे छान कुरकुरीत व टेस्टि लागते. तसेच बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. इडली-डोसा पिठामध्ये फक्त घरात असणारे जिन्नस टाकले की मिनिटात ही डिश बनते. आपण ही डिश जेवताना किंवा नाश्तासाठी किंवा पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप इडली डोसा पीठ
2 टे स्पून तांदळाचे पीठ
2 टे स्पून रवा (बारीक)
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
3-4 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
1” आले (किसून किंवा बारीक चिरून)
1 टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये इडली डोसा पीठ घ्या. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्या. आले किसून किंवा चिरून घ्या.
आता इडली डोसा पिठामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, मिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून 5-10 मिनिट झाकून ठेवा.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये छोटे छोटे पिठाचे गोळे घालावे व माध्यम विस्तवावर छान कुरकुरीत तळून घ्यावे. सर्व तळून झाल्यावर गरम गरम पुनुगुलू चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.