In 20 Minutes Soft Easy Eggless Cake In Idli Stand Recipe In Marathi
20 मिनिटांत मऊ सोपा बिना अंड्याचा केक इडली स्टँड मध्ये मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी
आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत मग रोज छोटी सुट्टी व मोठी सुट्टी असे दोन डब्बे द्यावे लागतात. मग रोज प्रश्न पडतो छोट्या सुट्टीसाठी कोणता डब्बा बनवायचा व मोठ्या सुट्टी साठी कोणता डब्बा बनवायचा.
The In 20 Minutes Soft Easy Eggless Cake In Idli Stand Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Soft Easy Eggless Cake In Idli Stand
आज आपण छोट्या सुट्टीसाठी किंवा मुलांच्या नाश्ता साठी इडली स्टँड मध्ये 20 मिनिटात मस्त मऊ केक बनवणार आहोत. केक लहान असो किंवा मोठे असो सर्वाना आवडतो. तसेच इडली स्टँड मध्ये बनवलेला कएके दिसायला आकर्षक दिसतो. इडली स्टँड मध्ये बनवायचा केक बनवायला अगदी सोपा आहे. बनवून पहा सगळे आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
बेकिंग वेळ: 20 मिनिट
वाढणी: 16 केक बनतात
साहित्य:
2 कप मैदा
1/2 कप कस्टर्ड पावडर
1 कप पिठीसाखर
1 कप + 2 टे स्पून दूध (कोमट)
1/2 कप तेल किंवा बटर
1 टी स्पून लिंबुरस
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
1/2 टी स्पून व्हनीला एसेन्स
2 टे स्पून टुटी फ्रूटी
कृती: मैदा चाळून घ्या. दूध कोमट करून घ्या. इडली स्टँड मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. त्यामध्ये 1 कप मीठ घालून ठेवा. इडली स्टँडच्या प्लेटला तेल लावून ठेवा. एका बाउलमध्ये टुटी फ्रूटी घेऊन त्यावर थोडासा मैदा लाऊन घ्या.
एका बाउलमध्ये कोमट दूध घेऊन त्यामध्ये लिंबुरस घालून थोडेसे मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये तेल घालून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून कस्टर्ड पावडर घालून एकसारखे करून घ्या, त्यानंतर त्यामध्ये मैदा घालून मिक्स करून घ्या, पण गुठळी राहता कामा नये.
आता त्यामध्ये बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून त्यावर 2 टे स्पून दूध घालून मिक्स करून घ्या पण मिक्स करताना हळुवार पणे एकाच डायरेक्शननि मिक्स करा. मग त्यामध्ये निम्मी टुटी फ्रूटी घालून मिक्स करा. आता आपले केकचे मिश्रण तयार झाले.
आता थोडे थोडे केकचे मिश्रण इडली स्टँड च्या प्लेट मध्ये घालून त्यावर थोडे टुटी फ्रूटी घालून सजवा. संपूर्ण मिश्रण इडली स्टँड च्या प्रतेक प्लेट मध्ये घातल्यावर प्रतेक प्लेट इडली स्टँडमध्ये ठेवून मग झाकण लाऊन घ्या. प्रथम 5 मिनिट विस्तव मोठा ठेवा त्यानंतर 15 मिनिट विस्तव बारीक करा. म्हणजे एकूण 20 मिनिट केक बेक करायचा आहे.
20 मिनिट झाल्यावर झाकण काढून इडली स्टँड मधील प्लेट बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर केक काढून सर्व्ह करा. मुलांचा केक मिनिटांत संपेल