चटपटीत आलु-शिमला मिर्चची सुकी भाजी डब्यासाठी अशी भाजी कधी बनवली नसेल एकदा करून पहा
Spicy Tasty Aloo-Shimla Mirchi Chi Bhaji For Tiffin Different Style Recipe In Marathi
आपण बटाटा व शिमला मिर्चची भाजी नेहमी बनवतो. पान अश्या प्रकारची भाजी कधी बनवली नसेल. तर एकदा जरूर बनवून पहा सगळे अगदी आवडीने खातील.
बटाटा शिमला मिर्चची भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच अश्या प्रकारची भाजी स्वादिष्ट लागते. मुलांना डब्यामध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारची भाजी लागत असते. डब्यासाठी सुकी भाजी म्हणजेच मुलांना किंवा ऑफिसमध्ये जाताना ही भाजी मस्त आहे.
The Spicy Tasty Aloo-Shimla Mirchi Chi Bhaji For Tiffin Different Style In Marathi can be seen on our You tube Chanel Aloo-Shimla Mirchi Chi Bhaji For Tiffin
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
3 मध्यम आकाराचे बटाटे
2 मध्यम शिमला मिरची
1 मोठ्या आकाराचा टोमॅटो
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
3-4 हिरव्या मिरच्या
7-8 लसूण पाकळ्या (चिरून)
1” आले (चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरा
1/4 टी स्पून हिंग
मसाला करिता:
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून आमचूर पावडर
1 टी स्पून कसूरी मेथी
कृती: प्रथम बटाटे सोलून चिरून पाण्यात घालून ठेवा. शिमला मिरची धुवून चौकोनी तुकडे करून घ्या. टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या, आल-लसूण बारीक चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका बाउल मध्ये हळद, लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, आमचूर पावडर, कसूरी मेथी मिक्स करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग घालून मग हिरवी मिरची, आल-लसूण घालून अर्धा मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये कांदा घालून थोडा परतून घ्या.
आता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिट वाफवून घ्या बटाटा निम्मा शिजला की त्यामध्ये शिमला मिरची व टोमॅटो घालून मीठ घालून 2 मिनिट शिजू द्या, झाकण ठेवले तरी चालेल मधून मधून झाकण काढून हलवून घ्या.
आता भाज्या थोड्या शिजल्या की त्यामध्ये आपण मसाले घालून मिक्स करून परत दोन मिनिट झाकण ठेवून भज्या वाफवून घ्याव्या.
आपली भाजी आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे कोथिंबीर घालून चपाती किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.