घरात मुले 4 दिवस असेच कुरकुरीत हेल्दी व्हेज टोस्ट सँडविच बनवायला सांगतात
Spicy Vegetable Bread Toast Sandwich On Tawa Recipe In Marathi
मुलांना भूक लागली की त्याना लगेच खायला पाहिजे असते. फ्रीजमध्ये ब्रेड आहे व भाज्या सुद्धा आहेत तर मग आपण मुलांचे आवडतीचे व ते सुद्धा पौष्टिक व्हेज ब्रेड टोस्ट सँडविच बनवू शकतो.
The Spicy Vegetable Bread Toast Sandwich On Tawa Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Spicy Vegetable Bread Toast Sandwich On Tawa
ब्रेड सँडविच बनवताना कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटे उकडून, कोथिंबीर व काही मसाले वापरुन हे सँडविच बनवायचे आहेत. असे मस्त कुरकुरीत सँडविच मुले अगदी आवडीने खातात. माझी मुले व नवरा अश्या प्रकारचे सँडविच नेहमी बनवायला सांगतात.
साहित्य:
8 ब्रेड स्लाइस
2 बटाटे उकडून
1 छोटे गाजर (बारीक चिरून)
1 छोटी शिमला मिरची (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (बिया काढून बारीक चिरून)
1/4 कप कोथिंबीर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1/2 टी स्पून काळे मीठ
मीठ चवीने
1/2 टी स्पून चाट मसाला
1/2 टी स्पून मिरे पावडर
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
2 टे स्पून टोमॅटो केचप
बटर टोस्ट भाजण्यासाठी
कृती: बटाटे उकडून सोलून किसून घ्या, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची व गाजर बारीक चिरून घ्या, टोमॅटो बिया काढून चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.
एका बाउल मध्ये बटाटे किसून घ्या, मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून काळे मीठ, साधे मीठ चिली फ्लेस्क, मिरे पावडर, चाट मसाला, टोमॅटो केचप घालून मिक्स करून घ्या.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा. एक ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर बनावलेले सारण ठेवून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून ब्रेड ला थोडे बटर लावून छान क्रिस्पि होई पर्यन्त भाजून घ्या.
आता गरम गरम व्हेज ब्रेड टोस्ट सँडविच सर्व्ह करा.