पालकची पातळ भाजी अशी बनवली तर पालक न खाणारे सुद्धा पालक बरोबर 2 चपात्या जास्तच खातील
Swadisht Palak Bhaji | Spinach Bhaji Different Style Recipe In Marathi
पालक ही भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामध्ये असणारे सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला गुणकारी आहेत. बरेच जण पालक भाजी खात नाहीत. पालेभाजी खायचा कंटाळा करतात.
The Swadisht Palak Bhaji | Spinach Bhaji Different Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Swadisht Palak Bhaji | Spinach Bhaji
आज आपण पालकची पातळ भाजी अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. पालकची अश्या प्रकारची भाजी पाहून पालक भाजी न खाणारे सुद्धा पालकची भाजी खातील उलट दोनच्या आयवजी चार चपात्या खातील इतकी मस्त टेस्टि लागते.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
1 पालक जुडी
2 टे स्पून शेंगदाणे
2 टे स्पून बेसन
1 टे स्पून तीळ
1 टी स्पून तेल
2 लसूण पाकळ्या ठेचून
2 हिरव्या मिरच्या (स्लीट करून)
1 टे स्पून तेल
1 टे स्पून बटर किंवा तूप
1 टी स्पून धने
1/2 टी स्पून जिरे
2 सुक्या लाल मिरच्या
2-3 लसूण पाकळ्या ठेचून
1 मध्यम आकाराचा कांदा चिरून
1 छोटा टोमॅटो चिरून
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तूप
4-5 लसूण पाकळ्या ठेचून
1 टी स्पून तीळ
1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
कृती: प्रथम पालक चांगला धुवून बारीक चिरून घ्या. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या, लसूण सोलून घ्या, आल धुवून चिरून घ्या.
एका पॅन मध्ये 2 टे स्पून शेंगदाणे थोडेसे गरम करून घ्या मग त्यामध्ये 2 टे स्पून बेसन थोडे गरम करून घ्या, आता त्यामध्ये 1 टे स्पून तीळ घालून थोडे गरम करून घ्या मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून बाजूला ठेवा.
पॅनमध्ये 1 टी स्पून तेल घालून 2- लसूण पाकळ्या कुटून टाका व 2 हिरव्या मिरच्या टाकून मग त्यामध्ये चिरलेला पालक घालून थोडेसे मीठ घालून मंद विस्तवावर 5-7 मिनिट शिजवून घ्या, पाणी आजिबात टाकायचे नाही पालकच्या अंगच्याच पाण्यात शिजवून घ्यायचा.
दुसऱ्या एका पॅनमध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये थोडे तूप टाका मग त्यामध्ये 1 टी स्पून धने 1/2 टी स्पून जिरे 2 लाल सुक्या मिरच्या व 2-3 लसूण पाकळ्या चिरून टाका थोडेसे परतून घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या.
मग आले चिरलेले व टोमॅटो टाकून मिक्स करून झाकण ठेवून 1 मिनिट शिजू द्या. आता त्यामध्ये धने पावडर, हळद व लाल मिरची पावडर घालून एक मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये वाटलेले बेसन घालून मिक्स करून मग त्यामध्ये 1 कप गरम पाणी घालून उकळी येवू द्या मग त्यामध्ये पालक टाकून 1-2 मिनिट वाफ येवू द्या.
आता तडका देण्यासाठी 1 टे स्पून तूप, जिरे, लसूण व तीळ घालून विस्तव बंद करून थोडीशी लाल मिरची पावडर घालून भाजी वर तडका टाकून मग सर्व्ह करा.