Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style Recipe In Marath

Chicken Khima Kheema
Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style

टेस्टि स्पायसी ढाबा स्टाइल चिकन खिमा एकदा अश्या पद्धतीने करून पहा सगळे मागून खातील

Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style Recipe In Marathi

चिकन चा कोणता सुद्धा पदार्थ नॉनव्हेज लव्हर्सना आवडतो. आज आपण असाच एक चिकन खिमा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

The Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style

चिकन खिमा हा आपण सुका बनवणार आहोत. चिकन खिमा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. चिकन खिमा आपण चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी

साहित्य:
400 ग्राम खिमा
2 मध्यम आकाराचे कांदे
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
1/2 वाटी कोथिंबीर
2 हिरव्या मिरच्या
12-14 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
२ टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून तंदुरी चिकन मसाला
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
3 टे स्पून तेल
लवंग, दालचीनी, मिरे, जिरे
कोथिंबीर सजावाटी करिता

Chicken Khima Kheema
Tasty Spicy Chicken Kheema Dhaba Style

कृती: प्रथम चिकन खिमा धुवून चाळणीवर निथळत ठेवा. कांदा चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुतून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या.

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला घालून चिरलेला कांदा घालून घालून थोडा परतून त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून थोडी परतून त्यामध्ये हळद व मीठ घालून मिक्स करून चिकन खिमा घालून मिक्स करून मंद विस्तवावर परतून घ्या, परतत असताना त्याला पाणी सुटेल तर त्याच पाण्यात चिकन खिमा परतून घ्या.

आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला, तंदुरी चिकन मसाला घालून थोडेसे पाणी घालून खिमा परत परतून घ्या. थोडा परतून झाल्यावर परत थोडे पाणी घालून परतून घ्या.

मग त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून मंद विस्तवावर 5-7 मिनिट चिकन खिमा शिजवून घ्या.

आता झाकण काढून त्यामध्ये लिंबुरस व कोथिंबीर घालून मिक्स करून चपाती, पराठा, भाकरी किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करा.

 

 

 

 

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.