टेस्टि झटपट सोपी पनीर ग्रेव्ही डब्यासाठी सगळे तारीफ करतील व बोटे चाटून खातील
Tasty Spicy Different Paneer Gravy For Tiffin Recipe In Marathi
पनीरची ग्रेव्ही आपण निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज आपण पनीरची ग्रेव्ही अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. पनीर मसाला ग्रेव्ही बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण अश्या प्रकारची ग्रेव्ही पाहुणे येणार असतील किंवा इतर वेळी किंवा डब्यासाठी सुद्धा बनवू शकतो.
The Tasty Spicy Different Paneer Gravy For Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Different Style Paneer Gravy For Tiffin
पनीर ग्रेव्ही बनवताना आपण जो मसाला बनवणार आहोत तो आपण मसाला बनवून फ्रीजरमध्ये 2-4 दिवस ठेवून कधी सुद्धा बनवू शकतो. खूप निराळी व मस्त रेसिपी आहे.
पनीर मसाला ग्रेव्ही ही तिखट नाही त्यामुळे आरामात मुले 2-3 चपाट्या खाऊ शकतात.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
200 ग्राम पनीर
मसाला करिता:
2 मोठे कांदे (चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1” आले
2 हिरव्या मिरच्या
2 टे स्पून सुके खोबरे (किसून)
7-8 काजू
1 मोठ्या आकाराचा टोमॅटो
1 टे स्पून तेल
1 टे स्पून बटर+1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
2-3 लवंग
1” दालचीनी
7-8 मिरे
1 तमालपत्र
2 टे स्पून दही
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून कसूरी मेथी
मीठ चवीने
कृती: पनीर कापून बाजूला ठेवा, कांदा चिरून घ्या, लसूण सोलून घ्या, हिरव्या मिरच्या चिरून घ्या, कोथिंबीर धुवून चिरून घ्या, टोमॅटो धुवून चिरून घ्या,
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा थोडा परतून घेऊन त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून परत 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मऊ होई पर्यन्त परतून घ्या, आता त्यामध्ये किसलेले खोबरे व काजू घालून परत थोडे परतून विस्तव बंद करून मिश्रण थंड होऊ द्या, मिश्रण थंड झालेकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग, दालचीनी, मिरे, तमालपत्र घालून वाटलेला मसाला घालून 5 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये दही घालून परत 2-3 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला मीठ घालून 1 मिनिट परतून 3/4 कप पाणी घालून झाकण ठेवून 5-7 मिनिट मसाला शिजवून घ्या.
आता मसाला शिजला की त्यामध्ये पनीरचे तुकडे व कसूरी मेथी घालून मिक्स करून झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊ द्या.
गरम गरम पनीर मसाला चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.