टेस्टि झणझणीत मोमोज चटणी व्हेज व नॉनव्हेज मोमोजसाठी
Tasty Spicy Zatpat Momos Chutney Recipe In Marathi
आपण मोमोज बनवतो त्यासाठी एकदम निराळी स्पेशल मोमोज चटणी बनवतात त्यामुळे मोमोज खाताना मस्त चव येते व मज्जा सुद्धा येते. खर म्हणजे मोमोज चटणीची कमाल आहे. चटणी मुळे मोमोज खाताना चव येते.
The Tasty Spicy Zatpat Momos Chutney Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Zatpat Momos Chutney
मोमोज चटणी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. मोमोज चटणी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. त्याचा लाल भडक रंग खूप मोहक दिसतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
4 मोठ्या आकाराचे टोमॅटो
4-5 लाल सुक्या मिरच्या (2 तिखट मिरच्या +3 काश्मिरी मिरची रंगासाठी)
2 टे स्पून तेल
6-7 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
1” आले (बारीक चिरून)
1 टी स्पून व्हेनिगर
1 टी स्पून सोया सॉस
मीठ व साखर चवीने
1 टे स्पून कोथिंबीर चिरून
कृती: टोमॅटो धुवून त्याला चिरा पाडून घ्या. एका स्टीलच्या पातेल्यात पाणी घेऊन गरम करायला ठेवा मग त्यामध्ये टोमॅटो किंवा सुक्या मिरच्या घालून 10-12 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग पाणी काढून टोमॅटो थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. आल-लसूण बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आल-लसूण थोडेसे परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो प्युरि घालून त्यामध्ये व्हेनिगर, सोया सॉस, साखर व मीठ घालून एक चांगली वाफ येवू द्या मग थंड झाल्यावर मोमोज बरोबर सर्व्ह करा.