टिप्स अँड ट्रिक्स: बटाट्याला मोड येतात खराब होतात, बटाटे (आलु) जास्त दिवस कसे ताजे टिकवायचे
Tips & Tricks: How To Store Potatoes Fresh For Long Time In Marathi
आपण बाजारात जात आहात बर मग येतांना 5-6 किलो बटाटे आणा म्हणजे बटाटे आणायला जायला सारखे सारखे बाजारात जायला नको. मग काही दिवस झाले की बटाटे खराब व्हायला लागतात. बटाटे खराब झालेकी मग काय करायचे फेकून द्यावे लागतात. तुम्ही सुद्धा बाजारात गेला की जास्त प्रमाण बटाटे आणत असाल व काही दिवस झाले की बटाटे खराब झाल्यावर फेकून देत असाल.
TheTips & Tricks: How To Store Potatoes Fresh For Long Time In Marathi can be seen on our You tube Chanel How To Store Potatoes Fresh For Long Time
बटाटे हे आपल्याला रोजच्या जीवनात लागतात कारणकी आपण आमटी, भाजी बनवताना वापरत असतो. तसेच झटपट नाश्तासाठी आलु पराठे, वडे मिठाई ई साठी वापरत असतो. त्यामुळे ते जास्त प्रमाणात लागतात. मग आपण जास्त प्रमाणात बटाटे आणतो पण आपल्याला माहीत आहे का बटाटे जास्त प्रमाणात आणले की जास्त दिवस कसे ताजे तवाने ठेवायचे.
बटाटे जास्त प्रमाणात आणून ठेवले की ते लवकर खराब होतात, त्याला मोड येतात किंवा ते सुकून त्यावर सुरकुत्या येतात किंवा मऊ पडतात असे बटाटे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत व ते फेकून देण्या शिवाय दूसरा पर्याय रहात नाही. कारण की त्यावर रासायनिक प्रक्रिया झालेली असते बटाट्याला कोंब आल्याने त्यामधील कार्बोहाड्रेट चे रूपांतर साखरेत निर्माण होते.
बरेच लोक बटाटे अश्या ठिकाणी ठेवतात की जेथे हवा खेळती रहात नाही, मग बटाटे लवकर खराब होण्याचे चानसेस असतात. तर मग आपल्याला वाटत असेल की बटाटे जास्त दिवस ताजे तवाने रहावेत व ते खराब होऊ नयेत तर बटाटे साठवून ठेवताना नेहमी हवेशीर जागी ठेवा. जर बटाटे आपण परडीमध्ये, बॅगमध्ये किंवा पॉलीथिन बॅगमध्ये किंवा डब्यात ठेवत असाल तर त्याचे तोंड नेहमी उघडे ठेवावे म्हणजे त्यामुळे बटाटे खराब होत नाहीत.
एक छोटीशी टीप आहे आपण जास्त प्रमाणात घरात बटाटे आणून ठेवले तर आपण बास्केट मध्ये ठेवताना त्यामध्ये वर्तमान पत्राचे तुकडे करून टाका व त्यामध्ये बटाटे स्टोर करा त्यामुळे बटाटे खराब न होता त्याला कोंब न येता जास्त दिवस चांगले राहतात.
बटाटे कधी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नये:
बरेच जन बटाटे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवतात पण असे करणे चुकीचे आहे कारणकी बटाट्यामध्ये स्टार्च असतो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा बदल सारखेच्या रूपात होतो मग बटाटे खराब व्हायला लागतात. म्हणून बटाटे नेहमी उघड्या जागेवर ठेवावे.
बटाटे इतर भाज्याच्या बरोबर ठेवू नयेत:
बटाटे लवकर खराब होण्याचे कारण की, बरेच लोक बटाटे ठेवताना कांदा, टोमॅटो, लिंबू किंवा काही भाज्यांच्या सोबत ठेवतात मग त्याच्या परिणाम होऊन बटाटे खराब होतात. कांदे-बटाटे एकत्र ठेवले तर कांदे व बटाटे दोन्ही खराब होतात, लिंबू सोबत बटाटे ठेवले तर लिंबू मध्ये सिट्रिक एसिड असते. त्यामुळे बटाटे खराब होतात.
जास्त गरम जागी बटाटे ठेवू नयेत:
बटाटे हवादार जागी ठेवावे ह्याचा अर्थ असा नाही की बटाटे उष्ण जागी ठेवावे. तर अश्या जागी ठेवावे की तेथे जास्त गरम हवा नको. किंवा ऊन नको. बरेच वेळ काही जन मायक्रोवेव्ह् किंवा गॅसच्या जवळ बटाटे ठेवतात. त्यामुळे सुद्धा बटाटे खराब होतात. तर अश्या जागी ठेवा की जेथे जास्त गरम किंवा जास्त थंड हवा नसेल. आपण जमिनीवर पेपर टाकून त्यावर सुद्धा बटाटे पसरवून ठेवू शकतो.