3 प्रकारच्या हेल्दी कलरफुल इडली फ्राय मुलांसाठी बनवून पहा डब्बा मिनिटात संपेल
3 Types Tasty Healthy Idli Fry For Kids Tiffin Recipe In Marathi
इडली हा पदार्थ जरी साऊथ ह्या भागातला लोकप्रिय असला तरी तो भारत भर लोकप्रिय झाला आहे. इडली डोसा उतपा हे पदार्थ आरोग्यदायी सुद्धा आहेत तसेच ते पचायला सुद्धा हलके आहेत.
आपण इडली बनवतो पण त्यामध्ये अजून हेल्दी बनवू शकतो. आपण पालक, बीटरूट घालून शकतो किंवा भाज्या सुद्धा घालू शकतो. त्यामुळे टेस्टि पण लागतात व हेल्दी सुद्धा बनतात. मी ह्या अगोदर मसाला इडली व पालक इडली कशी बनवायची त्याचे विडियो प्रकाशित केले आहेत.
The 3 Types Tasty Healthy Idli Fry For Kids Tiffin Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel 3 Types Tasty Healthy Idli Fry For Kids Tiffin
साहित्य:
इडली बॅटर
1/4 कप पालक पयूरी
1/4 कप बीटरूट पयूरी
मीठ चवीने
तेल इडली स्टँडला लावण्यासाठी
इडली फ्राय करण्यासाठी:
6-7 इडली साठी
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
10-15 कडीपत्ता पाने
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
कृती: प्रथम इडलीचे पीठ बनवून घ्या. मग थोडासा पालक स्वच्छ धुवून घेऊन उकडून घेऊन त्याची मिक्सरमध्ये पयूरी बनवून घ्या. बीटरूट थोडे उकडून मिक्सर मध्ये वाटून घ्या.
इडली पिठामध्ये चवीने मीठ घालून तीन भाग करून घ्या, एक भाग पांढराच ठेवा. दुसऱ्या भागात पालक पयूरी मिक्स करा मग तिसऱ्या भागात बीटरूटची पयूरी मिक्स करा.
इडली पात्रामध्ये पाणी गर्ण करायला ठेवा. इडली पात्राला तेल लाऊन त्यामध्ये इडलीचे पीठ घालून झाकण लाऊन 12-13 मिनिट स्टीम द्या. मग झाकण काढून इडली थंड करायला ठेवा. इडल्या थंड झाल्यावर त्याचे एक सारखे तुकडे करून घ्या. जर आपल्या कडे छोट्या छोट्या इडली बनवण्याचे इडली पात्र असेलतर ते वापरा त्यांनी इडली खूप मस्त दिसेल.
एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता पाने घालून काश्मिरी लाल मिरची पावडर घालून इडलीचे तुकडे घालून मिक्स करून घ्या. मग 2 मिनिट झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊ द्या. मग वरतून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.