4 ऑगस्ट 2024 आषाढी दीप अमावस्याला दीपदान करण्याचे महत्व,पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय
4 August 2024 Ashadhi Deep Amavasya Deep Daan Karnyache Mahatva Sathi Upay
4 ऑगस्ट 2024 रविवार रोजी आषाढी अमावस्या आहे. आषाढी अमावस्यालाच दीप अमावस्या म्हणून सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रमध्ये आषाढी अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या म्हणून सुद्धा संबोधले जाते. गटारी अमावस्या म्हणजे श्रावण सुरू होण्याच्या अगोदरचा दिवस श्रावण महिना चालू झाला की मांसाहार करत नाहीत म्हणून आषाढी अमावस्याच्या दिवशी मांसाहार केला जातो. पण आता कालांतराने पद्धत बदलत चालली आहे.
आषाढ महिना हा भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. आषाढ महिन्यात उप्स तपास करून भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे त्याचे आशीर्वाद मिळतात.
आषाढ महिन्यातील अमावस्या ही महत्वपुर्ण मानली जाते. कारणकी ह्यादिवशी पितरांना तर्पण देवून त्यांची क्षमा मागितली जाते म्हणजे आपल्या कडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागितली जाते. तसेच ह्यादिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पितरांना शांती मिळते. त्यासाठी काही सोपे उपाय सुद्धा पुढे दिलेले आहेत.
आषाढ अमावस्या आरंभ: 3 ऑगस्ट 2024 दुपारी 3:50
आषाढ अमावस्या समाप्ती: 4 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 04:42
आषाढ अमावस्याला दीप अमावस्या सुद्धा म्हंटले जाते. ह्या दिवशी आपल्या घर साफ करून मुख्य दरवाजा साफ करून सडा रांगोळी काढून घरातील देव स्वछ करून घरात जेव्हडे दिवे आहेत ते साफ करून घ्यावे. आषाढी अमावस्याच्या दिवशी दीप दान करण्याचे महत्व आहे.
The 4 August 2024 Deep Amavasya Deep Daan Karnyache Mahatva Sathi Upay In Marathi can be seen on our You tube Chanel 4 August 2024 Deep Amavasya
आषाढ अमावस्याच्या दिवशी सकाळी पूजा अर्चा करून आपल्या घरात जेव्हडे दिवे आहेत ते साफ करून ते देवा समोर प्रज्वलित करावेत तसेच आपण पुरणाचे दिवे किंवा कणकेचे गोड दिवे बनवून प्रज्वलित करू शकतो.
कणकेचे गोड दिवे कसे बनवावे त्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे : कणकेचे गोड दिवे
4 ऑगस्ट 2024 रविवार ह्या दिवशी अमावस्या आहे. दीप दान का करावे ते आपण पाहू या.
* आपल्या घरातील कोणाचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून दीपदान करावे.
* आपल्या घरातील ज्या व्यक्ति मृत झालेल्या आहेत त्यांच्या उद्धारा करिता दीप दान करावे.
* भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करण्यासाठी दीप दान करावे.
* राहू, केतू, शनि व यम ह्यांच्या अशुभ प्रभाव आपल्यावर किंवा आपल्या घरातील व्यक्तींवर होऊ नये म्हणजेच त्यांच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी दीपदान करावे.
* आपल्या घरातील वाद विवाद भांडण तंटे मिटवेत किंवा होऊ नयेत व त्यापासून वाचण्यासाठी दीप दान करावे.
* आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा म्हणून दीपदान करावे.
* आपण मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा दीपदान करू शकता.
* आपल्या घरातील मंगलकार्य यशस्वी पणे पार पडण्यासाठी दीपदान करावे.
* आपल्या घरात नेहमी धन समृद्धी राहावी व सुख शांती राहावी म्हणून दीपदान करावे.
* दीप लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान केल्याचे फळ प्राप्त होते.
आता आपण अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय करावे.
* आषाढी अमावस्याच्या दिवशी गंगा नदीत किंवा पवित्र नदीत स्नान करावे त्यामुळे पितृ देवतांच्या आत्म्याला शांती मिळते.
* धार्मिक मान्यता अनुसार आपल्या कुटुंबात मृत व्यक्तीचे विधिवत अंत्य संस्कार केले नसल्यास पितृ दोष होतो. ज्यांनी आपल्या आई-वडिलांचा अपमान केला आहे त्यांना सुद्धा ह्यांचा सामना करावा लागतो. मृत्यू नंतर पिंड पूजा केली नसेलतर पितृदोष असे म्हणतात. तसेच कडुलीमच्या झाडाची कतल करणे म्हणजे सुद्धा पितृदोष आहे असे म्हणतात.
* पितृदोषा मुळे सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी वाढतात. म्हणून आषाढी अमावस्याच्या दिवशी कुटुंबातिल प्रतेक व्यक्तिने दान करावे. त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होतील कावळे पक्षी, कुत्रे, गाई ह्यांना खावू घालावे पाणी द्यावे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतील.
* अमावस्याच्या दिवशी पितृ देवताना धूप दाखवले तर मुलांना आशीर्वाद मिळतात. अमावस्याच्या दिवशी दुपारी पितरांना धूप आगरबत्ती अर्पण करावी. व त्यांचे स्मरण करावे.